सोलापूर

निसर्गप्रेमीचा आगळावेगळा दसरा : विजयादशमीनिमित्त आपट्याच्या 45 रोपांचे वितरण 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः विजयादशमीचे औचित्य साधून येथील निसर्गप्रेमी अजित चौहान व त्यांच्या कुटुंबियांनी येथील स्मृती वनात आपट्याच्या झाडांची 45 रोपे भेट स्वरुपात प्रदान करण्यात आली. निसर्गप्रेमी चौहान दाम्पत्यांनी अगळावेगळा दसरा साजरा केला. 

दरवर्षी आपण आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना वाटून शुभेच्छा देतो ही परंपरा आहे. परंतु दुसऱ्या दिवशी त्याचे कचऱ्यामध्ये रुपांतर होते. काहीजण तर अक्षरशः त्या आपट्याच्या पानांना जाळून टाकतात. म्हणजे त्या पानांनी शोषलेला कार्बनडाय ऑक्‍साईड परत वातावरणात मिसळतो. ही झाडे जर आपण तोडली नसती तर पक्ष्यांनी या झाडावर घरटी बांधून नविन पिढी वाढवली असती. एक झाड म्हणजे जैवविविधतेचे भांडार असते. त्यावर अनेक किटक, फुलपाखरे, पक्षी, प्राणी व मनुष्य यांचे जीवन अवलंबून असते. पण दरवर्षी दुर्दैवाने आपण जुन्या रीती सांभाळत आपटा, कांचनार आणि अंजन या झाडांची हत्या करतो. हे कुठे तरी थांबायलाच पाहिजे. दरवर्षी आपण ही चूक करतो. 

याच अनुषंगाने आज निसर्ग मित्र अजित चौहान यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी संयुक्ता चौहान यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त 45 आपटयांच्या झाडांची रोपे निसर्गप्रेमींना भेट स्वरूपात देऊन एक आगळा-वेगळा दसरा साजरा केला. सोलापूरातील निसर्गरम्य अशा स्मृती वनांमध्ये हा कार्यक्रम निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण टी. व्ही. जाधवर म्हणाले की, आज आपल्याकडे वृक्ष संवर्धनाबाबत लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली आहे. पण यासोबतच एखादे वृक्ष जर कोणी तोडत असेल तर त्याची कल्पना वनविभागाला देणे किंवा ते वृक्ष तोडण्यापासून त्यांना परावृत्त करुन त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळेस नमूद केले. या वेळेस उपस्थित निसर्गप्रेमींना प्रत्येकी आपट्याचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास निसर्गप्रेमी संतोषभाऊ धाकपाडे, पंकज चिंदरकर, सुरेश क्षिरसागर, महादेव डोंगरे, विनय गोटे, अजय हिरेमठ, किरण माने, सिद्धांत चौहान, रुद्रप्रताप चौहान उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT