TikTok 
सोलापूर

बुलाती है, मगर जाने का नहीं..!

अक्षय गुंड

उपळाई (सोलापूर) : लाखो मुलांवर सध्या "टिकटॉक'चा प्रभाव आहे. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबतचे असंख्य व्हिडिओ ते सातत्याने शेअर करत असतात. सोशल मीडियावरील लाखो लोकांपर्यंत पोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणून या ऍपकडे बघितले जाते. या टिकटॉक ऍपवर नव्या रूपाने ट्रेंड व्हायरल झालेले पाहायला मिळते. यात जुनी गाणी, व्हिडिओ, कविता, शायरी पाहायला मिळतात. सध्या अशाच प्रकारे टिकटॉकवर "बुलाती है मगर जाने का नहीं' या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे.

शायरीच्या आधारे अनेक व्हिडिओ, मीम्स, जोक
शायर राहत इंदोरी यांनी "बुलाती है मगर जाने का नहीं' म्हटलेली ही शायरी सध्या टिकटॉकवर ट्रेंड बनली आहे. सोशल मीडियावर या शायरीच्या आधारे अनेक व्हिडिओ, मीम्स, जोक बनवले जात आहेत. टिकटॉकवर "आला वारा गेला वारा' हा ट्रेंड सुरू असतानाच त्यात हा नवीन ट्रेंड आला आहे. युवकांसह शाळा, कॉलेज, पोलिस स्टेशन आदी ठिकाणचे व्हिडिओज या ट्रेंडसाठी वापर करताना दिसत आहेत. टिकटॉकवर ट्रेंड झाल्यानंतर शायरी असो अथवा उखाणे त्याचा सकारात्मक, नकारात्मक वापर होणारच. तसेच या ट्रेंडचे देखील एक गाणे प्रसिद्ध झाले असून ते देखील व्हायरल होत आहे.

सध्या टिकटॉकवर एका शायरने म्हटलेल्या एका शायरीवर टिकटॉकप्रेमी दारू, सिगारेट यांसारख्या व्यसनांना बळी न पडण्याचा सकारात्मक तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालयांचा व्हिडिओत वापर करून नकारात्मक व्हिडिओ बनवत आहेत. परंतु युवकांनी यातून चांगले तेच घ्यावे, असे वाटते.
- विक्रांत कदम,
टिकटॉकप्रेमी, माढा

"बुलाती है मगर जाने का नहीं' ही शायरी सध्या टिकटॉकवर ट्रेंड बनली असून या माध्यमातून समाजातील चांगल्या-वाईट गोष्टी अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओ बनवून व्हायरल केले जात आहेत.
- हृषिकेश कोल्हापुरे,
टिकटॉक वापरकर्ते

टिकटॉक हे मनोरंजन व समाजप्रबोधनाचे एक चांगले माध्यम आहे. पण त्याचा वापर कुठे, कशाप्रकारे करतो याचे आपल्याला भान राहिले नाही. सध्या बघा ना "बुलाती है मगर जाने का नहीं' ही ओळ किती लाघवी आहे. याचे आपल्याला थोडेही तारतम्य नाही. याचा वापर कुठेही, कशाप्रकारे करतो, याची आपल्याला जाणीव राहिलेली नाही. यातूनच विकृती निर्माण होते. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे.
- संघमित्रा माने,
विद्यार्थिनी,
कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT