Sp Tejaswi 
सोलापूर

हातभट्ट्यांच्या जागेवर चिमुकल्यांसाठी मैदान ! मुळेगाव तांड्याची ओळख पुसण्यासाठी पोलिस अधीक्षकांचा पुढाकार

तात्या लांडगे

सोलापूर : शहरालगत असलेल्या मुळेगाव तांड्याची राज्यभर ओळख (ता. दक्षिण सोलापूर) म्हणजे हातभट्टी दारू तयार करणारे गाव म्हणून. प्रशिक्षणार्थी असताना काही दिवस सोलापुरात आलेल्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनाही त्या वेळी हेच ऐकायला मिळाले होते. तर आता पोलिस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीणचा पदभार घेतल्यानंतरही या गावाची ओळख तशीच आहे. त्यामुळे या गावाची ओळख पुसून टाकण्याच्या हेतूने त्या थेट हातभट्ट्या लावण्याची अडचणीची जागा स्वच्छ करून तीन एकर परिसरात चिमुकल्यांसाठी मैदान तयार करण्याचे काम सीएसआर फंडातून करत आहेत. 

मुळेगाव तांड्यातील काहीजणांचा मुख्य व्यवसाय म्हणजे अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार करून गावोगावी पुरविणे. या कामात अनेक तरुणांचाही सहभाग होता. दरवर्षी अनेकदा कारवाई करूनही ठराविक काळानंतर त्या जागेत हातभट्टी दारू तयार केली जात होती. एका ठिकाणी चार-पाच जणांची भट्टी अशाप्रकारे तिथे सुमारे 20 हातभट्ट्या लागायच्या. पोलिसांना गुप्तहेरांकडून माहिती मिळताच, पोलिसांची धाड त्या ठिकाणी पडायची. मात्र, पोलिस आणि हातभट्‌टी दारू तयार करणाऱ्यांचा लपंडाव वर्षानुवर्षे सुरूच होता. त्या परिसरात पाण्याची विहीर असल्याने त्यांना लागणारे पाणीदेखील जागेवरच मिळत होते. आजूबाजूला दाट झाडी अन्‌ काटेरी झुडपांमुळे त्या ठिकाणी लोकांचा संपर्कच नव्हता. 

या गावाची ओळख पुसण्याच्या हेतूने तीन तास जेसीबी चालवून ती जागा स्वच्छ करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील हातभट्टी निर्मितीची प्रक्रियाच बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता सीएसआर फंडातून त्या ठिकाणी व्हॉलिबॉलसह अन्य खेळांचे मैदान तयार करण्यात येणार आहे. या मैदानापासून काही अंतरावर चिमुकल्यांची जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यांना ही जागा वापरण्यासाठी खुली केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

सरपंचाशी चर्चा करून मैदानाचा विकास 
मुळेगाव तांडा येथील हातभट्टी तयार होणारी जागा चिमुकल्यांसह मोठ्या खेळाडूंनाही व्यायाम व विविध खेळांसाठी वापरता येईल, यादृष्टीने तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सरपंचांशी चर्चा सुरू केली आहे. गावकऱ्यांच्या पुढाकारातून त्या जागेचा वापर शारीरिक तंदुरुस्तीसाठी करता येईल, असे नियोजन आहे. त्या जागेचे सात-बारा काढून संबंधितांशीही चर्चा सुरू आहे. एकूण तीन एकराचा हा परिसर असून वर्षानुवर्षे ती जागा पडीकच होती. ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी मैदानाची उभारणी केली जात आहे. 

त्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी 
हातभट्टी तयार करणाऱ्या गावाची ओळख कायमस्वरूपी पुसली जावी, गावातील तरुणांना उच्चशिक्षण घेता यावे, स्पर्धा परीक्षेचे स्वप्न त्यांनीही पाहावे यादृष्टीने ग्रामीण पोलिसांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्या परिसरात एक खोली तयार करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी तैनात ठेवले जाणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : ISRO कडून भारतीय संवाद उपग्रह CMS-03 चे यशस्वी प्रक्षेपण

SCROLL FOR NEXT