mohol karykram.jpg 
सोलापूर

भाषणबाजीने कोरोना जाणार नाही तर एकजुटीचे प्रयत्न हवेत : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) ः कोरोना संदर्भात थोडासा जरी गाफील पणा झाला तरी त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, भाषणबाजी करून कोरोना जाणार नाही तर त्याला हरविण्यासाठी सर्वांचे एकजुटीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, शासनाने हाती घेतलेली ही मोहीम अत्यंत स्तुत्य आहे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करा कोरोना संदर्भातली मोहोळ तालुक्‍याची परिस्थिती चांगली आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहोळ तालुक्‍याच्या मोहिमेचा शुभारंभ चिखली ता मोहोळ येथून पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण पात्रुडकर, सरपंच इंदुमती वाघमोडे, उपसरपंच बापू शिरसाट, नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, श्रीमती लीना खरात, श्री कोळी मंडल निरीक्षक श्रीमती वाव्हळ, बिबीशन वागज,मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक, तलाठी साहिल पठाण, ग्रामसेवक माधुरी वसेकर, महेंद्र नवले, दत्ता पवार, शामराव मते, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कोरोना संदर्भातील मार्गदर्शक फलकांचे पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 
प्रास्ताविकात गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांनी मोहिमेचा उद्देश विषद करून तालुक्‍यातील कोरोना संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेतला, तसेच मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी आमदार माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चिखली येथील शामराव मते यांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री भरणे यांनी आरोग्य पथकाला मार्गदर्शक सूचना दिल्या. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT