Corona 
सोलापूर

पंढरपुरातील महापूर चाळ परिसरात आढळले आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; केला परिसर सील 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील संत पेठमधील महापूर चाळ परिसरातील आठ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 43 वर पोचली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. 

पंढरपूर शहरातील रोहिदास चौकातील तीन, मंदिर परिसरातील संत तुकाराम भवनजवळील एक, झेंडे गल्लीमधील एक अशा पाच व्यक्तींचे रिपोर्ट सोमवारी 
पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात शहरातील संत पेठेतील महापूर चाळ भागातील एका कुटुंबातील चार आणि दुसऱ्या कुटुंबातील तीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे रिपोर्ट मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी संत पेठ भागात जाऊन उपाययोजना सुरू केल्या असून, परिसर सील केला आहे. 

रात्री उशिरा आलेल्या अहवालात तालुक्‍यातील रोपळे येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. शहर व तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 65 झाली. सध्या उपचार सुरू असलेल्या 32 व्यक्तींमध्ये शहरातील 21, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील सहा आणि इतर तालुके व जिल्ह्यांमधील पाच व्यक्तींचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 189 लोकांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत शहर व तालुक्‍यातील 1083 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 963 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून अद्याप 120 अहवाल प्रलंबित आहेत. 

शहरातील रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT