SMC 
सोलापूर

महापालिकेच्या स्थायी समितीची कधी होईल निवडणूक? नगर विकास विभागाचे आले पत्र

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वच महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतींच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय नगरविकास विभागाने शुक्रवारी घेतला. त्यानुसार सोलापूर महापालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांना त्याबद्दल पत्राद्वारे माहिती दिली. 

कोरोनाची दुसरी लाट जोरात असून विषाणूचा विळखा अनेक शहरांमध्ये घट्ट होऊ लागला आहे. दिवसेंदिवस संक्रमणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण येऊ लागला आहे. त्यामुळे आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने 30 एप्रिलपर्यंत राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. या सर्व वस्तुस्थितीचा विचार करून महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतींच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापतींसह सदस्यांच्या निवडी पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश नगर विकास विभागाचे अव्वर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी काढले. या आदेशानुसार सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य व सभापती, परिवहन समिती सभापती आणि प्रभाग सहा -क येथील नगरसेवकपदाची पोटनिवडणूक लांबली आहे. त्याची माहिती नगरसचिवांनी शुक्रवारी महापौरांना दिली. 

इच्छुकांना महिनाभर करावी लागेल प्रतीक्षा 
कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी राज्य पातळीवर ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव महिनाभरात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरविकास विभाग एका महिन्यानंतर राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानुसार या निवडणुकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे महापालिकेतील स्थायी व परिवहन समितीसाठी इच्छुक असलेल्यांना महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, गटनेत्यांच्या निवडीच्या गोंधळामुळे रद्द झालेली निवडणूक प्रक्रिया, सदस्य निवडी पुन्हा कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सहा ते सात महिन्यांपर्यंत ही निवड असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पण आता आशा सोडल्याची चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Strike : सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप तुर्तास स्थगित मात्र 11 नोव्हेंबरला करणार निदर्शने आंदोलन!

माधवी खंडाळकर कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत? राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप

Crime: जावयानं माझ्या मुलीला मारलं, सासूची तक्रार... मात्र सत्य समोर आल्यानंतर तोंड लपवावं लागलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला

Pune Crime: आधी खून मग लोखंडी भट्टीमध्ये पत्नीचा मृतदेह जाळला; पुण्यातल्या वारजे भागात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT