PDR_Final 
सोलापूर

पंढरपूर पोटनिवडणुकीतून अकराजणांची माघार ! 19 उमेदवार रिंगणात; नेत्यांच्या विनंतीनंतरही सिद्धेश्‍वर आवताडे मैदानात

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज 11 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज कायम ठेवल्याने आवताडे यांना कुटुंबातील बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे आज निश्‍चित झाले. नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले, मोहन हळणवर आदी 11 जणांनी मात्र अर्ज मागे घेतले असून, 19 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध झाले होते. उर्वरित 30 पैकी किती उमेदवार अंतिम मुदतीमध्ये उमेदवारी मागे घेतात, याविषयी उत्सुकता होती. प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू, मंगळवेढा तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी परिचारक यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती, पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे हे कोणती भूमिका घेतात, याकडे दोन्ही तालुक्‍याचे लक्ष लागले होते. 

सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. परंतु सिद्धेश्वर आवताडे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. काल शुक्रवारी पुन्हा आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी सिद्धेश्वर आवताडे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली, परंतु तरीही सिद्धेश्वर आवताडे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

दरम्यान, आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे समाधान आवताडे यांना राजकीय विरोधकांच्या बरोबरच कौटुंबिक बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शैला गोडसे यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर (अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष), संजय चरणू पाटील (अपक्ष), अमोल अभिमन्यू माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (अपक्ष), रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भगीरथ भारत भालके (राष्ट्रवादी कॉंग्रेस), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पक्ष), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोंडीबा भोसले (बळिराजा पार्टी), सिद्धेश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी), बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारुती सोनवले, सिद्धेश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडुरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. 

मतदान शनिवार, 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार, 2 मे 2021 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी या वेळी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

Amravati Crime News : साहील लॉनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे खून; अमरावतीत १७ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणी मोठा खुलासा...

Pune Temperature : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुणे शहर परिसरात थंडीचा प्रभाव

SCROLL FOR NEXT