सोलापूर

कोरोनाच्या काळात दिला ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणावर भर 

संतोष सिरसट

सोलापूर ः कोणतीही समस्या असो आपले विचार पॉझिटिव्ह असले की त्यावर उपाय सापडतोच या विचारानेच सध्याच्या या महाभयंकर कोरोना महामारीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षकांपुढे लॉकडाऊनमध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवणे आणि नुसतेच शिक्षण चालू न ठेवता पालकांचा, विद्यार्थ्यांचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा मानसिकतेचा विचार करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे व ती टिकवणे याचे फार मोठे आव्हान होते. हा सर्व विचार करून आवश्‍यकतेनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन असे शिक्षण देण्यास सुरुवात केल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील शिक्षिका सरस्वती पवार यांनी "सकाळ'ला सांगितले. 

तंत्रज्ञानाच्या साधनांद्वारे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने सुरुवातीला तंत्रज्ञान साधने वापराबद्दल विविध स्तोत्रांमधून माहिती घेतली व मोबाईलवरच दरवर्षी 15 जूनला भरणारी शाळा 22 जूनपासूनच संध्याकाळी ऑनलाइन भरू लागली. पालकांसाठी विविध ऍप्स, प्ले स्टोअरवरून कसे डाऊनलोड करून घ्यावे, त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याची माहिती देणारे व्हिडिओ बनवले जसे, दीक्षा, गुगल मीट, मित्रा डेली प्रॅक्‍टीस हीऍप्लिकेशन्स घेतली. लॉकडाउन काळात पालक घरीच असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आपल्या पालकांना सहभागी करुन घेता आले. काही उपक्रम, स्पर्धा खास पालकांसाठीही ठेवल्या. जसे नाट्यीकरण स्पर्धा, आयपीएल क्रिकेट माहिती लेखन स्पर्धा, गोपाळकाला कथालेखन, आनापान साधना. यामध्ये पालकांनी सहभाग नोंदवत हे उपक्रम यशस्वी केले. इतक्‍या प्रचंड ताण तणावात असताना देखील पालकांनी सोशल डिस्टन्स पाळून व इतर आवश्‍यक काळजी घेऊन ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नव्हती, अशा शेजाऱ्यांच्या पाल्यांना आपल्या पाल्याबरोबर शिक्षण प्रवाहात ठेवले. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या उपक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरी मराठी विषयासाठी नाविण्यपूर्ण व्हिडिओ बनविण्याचे काम केल्याचेही पवार यांनी सांगितले. सध्या "आनापान साधनेतून सर्वांगीण विकासाकडे' हा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेला उपक्रम खूपच परिणामकारक होत आहे. जे विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित राहू शकत नाहीत तसेच शाळेतील इतर सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी 100 टक्के वर्गणीतून विजयकुमार वसंतपुरे निर्मिती स्वाध्याय मालांचे मोफत वाटप केले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT