Vitthal Gabhara 
सोलापूर

प्रक्षाळ पूजेचा वाद पेटला..! श्री विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा; काय केली मागणी? वाचा 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल मंदिरात 9 जुलै रोजी गाभाऱ्यात झालेल्या प्रक्षाळ पूजेच्या घटनेची दखल घेऊन मंदिर समितीने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यत कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि काही कर्मचाऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात जाण्यास मंगळवारी (ता. 21) बंदी केली. समितीच्या या निर्णयाविरोधात मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारून ही बंदी त्वरित मागे घ्यावी; अन्यथा 1 ऑगस्टपासून मंदिरातील सर्व कर्मचारी काम बंद करून आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. 

आषाढी आणि कार्तिकी यात्रेनंतर विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. यात्रा काळात जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी देव अखंड उभा असतो. त्यामुळे दमलेल्या विठुरायाचा थकवा दूर करण्यासाठी प्रक्षाळ पूजेच्या दिवशी देवाला गरम पाण्याने स्नान घातले जाते आणि मंदिरातील उपस्थित सर्वजण स्नान करतात. यंदा पूजा पूर्ण होण्यापूर्वीच गाभाऱ्यात अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्यात आली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन मंदिर समितीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचा आणि तोपर्यत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि संबंधित अन्य कर्मचाऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात जाण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. आता समितीने घेतलेल्या निर्णयाला मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. 

मंदिर समितीने केलेली ही कारवाई नैसर्गिक न्याय तत्त्वाला अनुसरून नाही. तसेच प्रक्षाळपूजा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रुढी व परंपरेनुसार झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गाभाऱ्यात जाण्यास केलेली बंदी तत्काळ मागे घ्यावी; अन्यथा 1 ऑगस्टपासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी काम बंद ठेवून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. 

द्वेषापोटी तक्रारी 
यासंदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे, की श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात 9 जुलै रोजी प्रक्षाळपूजा रुढी व परंपरेनुसार झाली होती. या पूजेच्या बाबतीत काही संघटनांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलटसुलट चर्चा सुरू करून त्याबाबतच्या तक्रारी दिल्या. नंतर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने सभा घेऊन मंदिरातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची खातरजमा व वस्तुस्थितीची शहानिशा न करता श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मालाड मधील मालवणीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; ६ जण गंभीर जखमी

U19 World Cup : ४ चौकार अन् ४ षटकारांसह वैभव सूर्यवंशीने विक्रमी फिफ्टी झळकावली, पण मोठा शॉट मारण्याच्या नादात झाला आऊट

रात्री 3 वाजता सशस्त्र दरोडा, प्रतिकार करणाऱ्या पितापुत्रावर चोरट्यांनी चाकूने केले वार, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर....

IND vs NZ 4th T20I : हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाणार, श्रेयस अय्यरची एन्ट्री होणार? जाणून घ्या भारताची Playing XI का बदलणार

नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!

SCROLL FOR NEXT