सोलापूर

नामशेष होताहेत वन्यजीव..! आपण विचार करणार आहोत का? 

परशुराम कोकणे

सोलापूर : माळरानावर थाटात वास्तव्य करणारा माळढोक पक्षी.., माळरानाचा वाघ म्हणून ओळखला जाणारा लांडगा.., निसर्गातील सफाई कामगार असणारा तरस... यासोबतच असंख्य प्रवासी पक्ष्यांचे माहेरघर असणारा सोलापूर जिल्हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेमध्ये सुद्धा अग्रेसर आहे. विविध कारणांमुळे आपली ही वन्यजीव संपदा धोक्‍यात आल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. 

सावधान.. समोर येताहेत चाइल्ड पॉर्नोग्राफीतील काळे चेहरे!
 

गेल्या काही वर्षात एखाद्याच माळढोकचे दर्शन
मंगळवारी जागतिक वन्यजीव संवर्धन दिन आहे. यानिमित्ताने सकाळने पर्यावरण अभ्यासकांशी संवाद साधला. माळढोक हा माळरानावरचा राजबिंडा पक्षी. परंतु बरीच वर्ष याच्या अधिवासात होणारा मानवीय हस्तक्षेप, अधिवासाची कमतरता, सोबतच पूर्वी झालेली शिकार, खाद्य उपलब्धता कमी असणे अशा अनेक कारणांमुळे माळढोक हा आपल्या जिल्ह्यातील नामशेष झाला. गेल्या काही वर्षात एखाद्याच माळढोकचे दर्शन नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य होत आहे. 

वन्यजीवांच्या प्रजननावर परिणाम
माळावरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांडग्यांची संख्या सुद्धा कमी होत आहे. लांडग्यांप्रमाणेच आपल्याकडील माळरानावर आढळणारा बेडूक, काही पालीच्या जाती या सुद्धा झपाट्याने कमी होत असल्याचे अभ्यासात समोर येत आहे. पाणी अडवण्यासाठी व जिरवण्यासाठी तयार केलेल्या शासकीय स्तरावरील योजना या गाव पातळीवरून माळावरती पोचल्या. तिकडे माळावरती चारी खोदून पाणी अडवण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे अनेक लहान-लहान वन्यजीवांच्या प्रजननावर याचा परिणाम झाल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे. 

वाढलेला मानवी हस्तक्षेप
अनेक लहान पक्षी, सरगोटा यासारखे सरडे, काही सापसुरळ्या यांच्या अधिवासाचे या मोहिमेमुळे तुकडे तुकडे (फ्रागमेंटेशन) झाले. याचा विपरीत परिणाम पुढील काही काळात नक्कीच दिसून येईल. या अशा प्रातिनिधिक उदाहरणातून आपल्या लक्षात येते की वन्यजीवांचा अधिवास कमी होणे, त्यामध्ये वाढलेला मानवी हस्तक्षेप, शिकार, यामुळे अनेक वन्यजीव झपाट्याने कमी होत आहेत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

शासकीय स्तरावर केला जाणारा अभ्यास, तयार केल्या जाणाऱ्या योजना या अतिशय प्रभावी असतात. परंतु प्रत्यक्षात राबवले जाणारे प्रकल्प यामध्ये तफावत आढळून येते. वन्यजीव रक्षणासाठी अधिवास संरक्षित व संवर्धित करणे गरजेचे आहे. सोबतच लोकजागृती व लोकशिक्षण अत्यावश्‍यक आहे. वन्यजीवांचा अधिवास संरक्षित राहिला तरच वन्यप्राणी वाचतील, वाढतील. यासाठी वैज्ञानिक स्वयंसेवी संस्था वनविभाग व पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याची गरज आहे. 
- डॉ. प्रतीक तलवाड, 
पर्यावरण अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT