hiremath zad.jpg 
सोलापूर

दरवर्षीच्या गणेश मूर्तींच्या आठवणी झाडांच्या रुपाने झाल्या हिरव्यागार 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः पर्यावरणपुरक गणपती दरवर्षी बसवल्यानंतर घरात विसर्जन केल्यानंतर विसर्जनाच्या मातीत गणपतीबाप्पाची आठवण म्हणून एक झाड वाढवायचे. आजही त्यावर्षीचा गणपती वृक्षरुपाने आपल्या सोबत आहे. या कामाची सुरुवात केल्यानंतर आता अनेक मित्राच्या घरी याच पध्दतीने झाडे लावली जात आहे. माझ्या घरात दरवर्षीच्या गणपतीची नऊ झाडे लागली आहेत. आता विद्यार्थी, शेजारी व मित्रांनी झाडे लावण्यास सुरुवात केली आहे असे मनोगत शिवानंद हिरेमठ यांनी व्यक्त केले. 

पर्यावरणवादी कार्यकर्ते व अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी या उपक्रमाची माहित दिली. . 

सुरुवातीला मी तलावाच्या काठावर पक्षी निरिक्षणासाठी फिरत होतो. उन्हाळ्यात पाणी आटल्यावर या तलावात गणेश मुर्तीचे अवशेष न विरघळलेल्या अवस्थेत दिसत असत. मूर्तीचे अवशेष व रासायनिक रंगामुळे या तलावातील जैवसाखळी विस्कळीत झाल्याचे दिसून येत होते. छोटे जिवाणू, मासे, किटक आणी विदेशातून येणारे पक्षी या सर्व घटकावर याचा विपरित परिणाम होत असल्याचे निरिक्षण केले. 
स्वतः पासून सुरवात करावी म्हणून घरी पर्यावरण पुरक गणपती बसवला. मातीचे गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेमध्ये मुर्ती करण्याचे शिकले. घरच्या घरी मूर्ती विसर्जीत केल्यानंतर बकेट मध्ये विरघळलेल्या मातीचे पाणी राहत असे. हे माती व पाणी कुुंडीत टाकून त्यात झाड लावले. दरवर्षी गणपतीच्या विसर्जनात राहिलेली माती कुंडीत टाकून त्यामध्ये एक झाड लावले गेले. 
त्यांच्यासोबत त्यांचे मित्र व परिचयातील व्यक्तींनी देखील गणपती घरीच विसर्जन करून उरलेल्या मातीचे कुंड्यात झाडे लावण्यास सुरुवात केली. विनित पलंगटी यांनी नंतर याच पध्दतीने झाडे लावली. त्यानंतर सुशांत कुलकर्णी, अजित चौहाण, अथर्व ईनामदार, बाळासाहेब लांबतुरे, संतोष धाकपाडे, महादेव डोंगरे, अवंती झिंजुरे, विनय गोटे, गणेश पवार, आदित्य क्षीरसागर व नम्रता चौगुले यांनी याच पध्दतीने दरवर्षीच्या गणेशाच्या आठवणी झाडाच्या रुपात जतन केल्या आहेत. आता हा पायंडा एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे जाऊ लागला आहे. 

 तुळस, सब्जा व गोकर्ण हे झाडे लावली
लाल मातीची गणपती केला तर विसर्जनानंतर झाड लावण्यासाठी वापरतो. शाडूच्या मातीचा गणपती केला तर तो दिवाळीत किल्ला बनवण्यासाठी वापरतो. आतपर्यंत या मातीमध्ये तुळस, सब्जा व गोकर्ण हे झाडे लावली आहेत. 
- विनित पलगंटी, सोलापूर 

 
 गुलाब व तुळस झाडे लावली
माझ्या घरी गौरीसोबत गणेश विसर्जन होते. तीन वर्षापासून शाडुची मूर्ती बनवत आहे. या मूतीचे विसर्जन केल्यानंतर त्यातील माती कुंडीत टाकली. त्यामध्ये गुलाब व तुळस अशी झाडे लावली आहेत. 
- सुशांत कुलकर्णी  सोलापूर
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT