ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY sakal
सोलापूर

परीक्षा शुल्क १० टक्के वाढणार! कागद, प्रिंटिंगचा खर्च वाढला; परीक्षा व मूल्यमापन मंडळ घेणार निर्णय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ३० ते १२० रुपये जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ३० ते १२० रुपये जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचा अंतिम निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळातून होणार आहे.

कोरोनामुळे विद्यापीठाने दोन वर्षे विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेतली होती. त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न होते. त्यानंतर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये झालेल्या परीक्षेसाठी सुद्धा वस्तुनिष्ठच प्रश्नपत्रिका होती. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अचानक तो निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. आता कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला असून, महाविद्यालये देखील ऑफलाइन सुरू झाली आहेत. त्यामुळे आगामी सत्र परीक्षा ऑफलाइनच होणार असून त्यासाठी आता वर्णनात्मक प्रश्न असतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. दररोज तीन सत्रात परीक्षा होईल. दरम्यान, प्रश्नपत्रिकांची छपाई, २० ते ३० पानांची उत्तरपत्रिका, कागदाचा खर्च वाढलेला आहे. पेपर तपासणीसाठी प्रत्येक पेपरला जवळपास आठ रुपयांचे शुल्क द्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क १० टक्के वाढेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दोन सत्रात ९० दिवसांचे अंतर

विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेताना दोन सत्रात किमान ९० दिवसांचे अंतर असणे बंधनकारक आहे. तीन महिने अध्यापन झाल्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली जाते. ९० दिवसांचे अध्यापन झालेले नसताना सत्र परीक्षा विद्यापीठ घेऊ शकत नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष आहेत. दरम्यान, १२ डिसेंबर रोजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडल्यानंतर आगामी सत्र परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होणार आहे. तोपर्यंत अभियांत्रिकीसह सर्वच विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होणार आहे. अभियांत्रिकीची परीक्षा सर्वांत शेवटी होईल.

परीक्षेसंबंधी ठळक बाबी...

  • विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील ७८ हजार विद्यार्थी देणार सत्र परीक्षा

  • प्रश्नपत्रिका वर्णनात्मक असणार; दररोज तीन सत्रात परीक्षांचे नियोजन

  • डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी २०२३ पासून सुरू होईल सत्र परीक्षा

  • शुल्कवाढीबाबत कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील ‘परीक्षा व मूल्यमापन मंडळ’ घेणार अंतिम निर्णय

  • दहा टक्के परीक्षा शुल्क अटळ; कोरोनामुळे थांबला होता प्रस्तावावरील निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT