Farmer
Farmer 
सोलापूर

विमा कंपनीकडून अन्यायाची परंपरा कायम ! "फळपीक'मधून भोसे, मरवडेतील द्राक्ष उत्पादकांना वगळले 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : हवामानावर आधारित 2019 मधील फळपीक विमा योजनेतील डाळिंब पिकाची भरपाई देताना तालुक्‍यातील तीन महसूल मंडळ वगळण्याची घटना ताजी असतानाच, भोसे आणि मरवडे या मंडळातील 196 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळल्याने अन्यायाची परंपरा कायम राहिली आहे. 

या विमा योजनेसाठी तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष, आंबा व लिंबू या पिकांचा विमा भरला. परंतु 2019 चा फळपीक विमा मंजूर करताना तालुक्‍यात विविध मंडलांमध्ये पडलेल्या पावसाच्या नोंदीवरून डाळिंब पिकाचा विमा मंजूर करताना मरवडे, मंगळवेढा व भोसे या तीन महसूल मंडळातील 4700 शेतकरी वगळण्यात आले. याबाबत या मंडळातील शेतकऱ्यांमधून विमा कंपनीच्या दुजाभाव करण्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात असतानाच, नुकताच मंजूर झालेल्या द्राक्ष पिकाच्या विम्यातून देखील मरवडे आणि भोसे या दोन महसूल मंडलांमध्ये वगळलेल्या 193 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या फळपिकांना धोका होऊ नये म्हणून मोठा गाजावाजा करत विमा भरण्याचे आवाहन केले असले, तरी या दोन मंडळांमधील शेतकऱ्यांची आता विमा भरण्याची मानसिकता होत नाही. द्राक्ष पिकाचा विमा मंजूर करताना देखील तालुक्‍यातील वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये वेगवेगळी रक्कम मंजूर केली गेली. विमा कंपनी ही स्वतंत्र असताना शेतकऱ्याला विमा भरपाई देण्याबाबत महसूल मंडळातील तहसीलकडील पावसाची आकडेवारी व महावेधची आकडेवारी यामध्ये योग्य समन्वय साधून सर्वच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ठराविक शेतकऱ्यांना लाभ देऊन इतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रताप विमा कंपनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहे 

मंडलनिहाय शेतकरी (कंसात दर हेक्‍टरी मंजूर रक्कम) 
आंधळगाव 74 (1033), मारापूर 110 (10300), बोराळे 104 (30900), हुलजंती 734 (41200 ), मंगळवेढा 203 (30900), भोसे 73 (0), मरवडे 113 (0). 

याबाबत रड्डे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी श्‍यामराव थोरबोले म्हणाले, हवामानाच्या लहरीपणामुळे द्राक्ष पिकाला कायम फटका बसत आहे. पिकाला जोखीम मिळावी म्हणून विमा भरला; परंतु भोसे मंडलला चुकीचे निकष लावून विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याने भविष्यात विमा देखील का भरावयाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT