22 फुटवे अन्‌ 50 कांड्यांचा ऊस! अडीच एकरात 241 टन उत्पादन 
सोलापूर

22 फुटवे अन्‌ 50 कांड्यांचा ऊस! अडीच एकरात 241 टन उत्पादन

22 फुटवे अन्‌ 50 कांड्यांचा ऊस! अडीच एकरात 241 टन उत्पादन

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे शेती केल्यास विक्रमी उत्पादन घेता येते, हे उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील शेतकरी संतोष जाधव यांनी दाखवून दिले आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सातत्याने दुष्काळ, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Covid-19) महामारीचे संकट, त्यात अतिवृष्टी (Heavy Rain) अशा एक ना अनेक संकटांनी शेतकरी वारंवार संकटात सापडला आहे. त्यामुळे शेती करणे म्हणजे एक आव्हानच निर्माण झाले आहे. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल, अन्‌ नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे शेती केल्यास विक्रमी उत्पादन घेता येते, हे उपळाई बुद्रूक (ता. माढा) (Madha) येथील शेतकरी संतोष जाधव (Santosh Jadhav) यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी अवघ्या अडीच एकरात 241 टन उसाचे (Sugarcane) उत्पन्न घेतले आहे.

उपळाई बुद्रूक हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा. परंतु गेली दोन ते तीन वर्षांपासून या भागात सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी पोचत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी ऊस लागवड, बागायतीकडे वळला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर या भागात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यातीलच एक म्हणजे शेतकरी संतोष जाधव. पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने त्यांनी दीड वर्षापूर्वी पहिल्यांदाच उसाची लागवड करण्यासाठी शेतीची पूर्ण मशागत करून ऊस लागवडीचे नियोजन केले. यामध्ये ऊस बेणे गोल्डन 86032 ची लागवड त्यांनी सरी पद्धतीने चार बाय चार अंतरावर दोन डोळे, ऊस बेण्याची लागवड केली होती. ऊस पिकांच्या उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी रासायनिक खताचा पहिला डोस त्यांनी दिला.

स्वतःचे वैयक्तिक कौशल्य वापरत त्यांनी योग्य नियोजन केल्याने उसावर कीड, माशी, पांढरी माशी या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. पहिल्यांदा रासायनिक खते व नंतर कोंबडी खताचा वापर त्यांनी केला. 'कष्ट दमदार असेल तर पीक जोमात येते' म्हणतात ना तसेच संतोष जाधव यांच्या कष्टाचे चीज झाले असून, त्यांच्या उसाच्या एका बुडास जवळपास 22 उसाचे फुटवे होऊन 50 काड्यांचा ऊस निघाला आहे. साधारणपणे एका उसाचे वजन नऊ किलोपर्यंत आहे. अडीच एकर ऊस लागवडीचा पूर्ण खर्च त्यांना एक लाख रुपयांच्या आसपास झाला असून, उसाचे एकरी 100 टनाचे विक्रमी उत्पन्न त्यांनी घेतले आहे. अडीच एकरात 241 टन ऊस उत्पादन संतोष जाधव यांनी घेतले आहे. उसाची संपूर्ण देखभाल संतोष जाधव यांच्यासह आई, पत्नी, मुलांनी केली आहे. सध्याचा कारखाना भाव अंदाजे धरल्यास सहा लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न त्यांना मिळाले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेतल्याने व 50 कांड्यांचा ऊस असल्याने परिसरात या शेतकऱ्याच्या उसाची चांगलीच चर्चा आहे.

पहिल्यांदाच उसाची लागवड केली. पै-पाहुण्यांचे यात बरेच मार्गदर्शन झाले. चांगले उत्पन्न मिळाल्याने, कुटुंबीयांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे. इतके टन उसाचे उत्पादन मिळाल्याने समाधान व आनंद वाटतोय.

- संतोष जाधव, शेतकरी, उपळाई बुद्रूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT