Farmer 
सोलापूर

वरुणराजाची कृपा तर कृषी केंद्राची अवकृपा ! "येथील' शेतकऱ्यांची सुरू आहे ससेहोलपट 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात या वर्षी पावसाने चांगलीच सलामी दिल्याने तालुक्‍यात खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये तूर, मूग, उडीद, मका ही पिके आहेत. "ब्रेक के बाद' पाऊस होत असल्याने त्याची उगवण चांगली झाली आहे. याबरोबरच उजनी लाभक्षेत्रात आडसाली उसाच्या लागवडीही झाल्या आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पन्न वाढावे म्हणून शेतकरी पिकांना खत टाकतात. परंतु केत्तूर परिसरातील कृषी सेवा केंद्राच्या दुकानात मात्र युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच सध्या सर्वाधिक मागणी असणारे युरिया खत मिळणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे येथे असणाऱ्या जय किसानच्या अधिकृत जंक्‍शन पॉइंटवरही युरिया खत उपलब्ध नाही. 

पिकांना सध्या खतांची आवश्‍यकता आहे. मात्र ही खते कधीच वेळेत उपलब्ध होत नाहीत. या वर्षीही पाऊस चांगला झाला असल्याने खतांसाठी शेतकरी मात्र दुकानात हेलपाटे मारून बेजार झालेले आहेत. या खताची मागणी जास्त परंतु पुरवठाच नाही, असा प्रकार झाला आहे. खत विक्रेते मात्र अजूनही "रॅक आला नाही' अशी उत्तरे देत आहेत. या वर्षी पाऊस वेळेवर झाला परंतु पिकांसाठी खतच मिळत नसल्याने नियोजन कसे करावे? या संभ्रमात शेतकरी पडले आहेत. लॉकडाउनमुळे खत कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे पुरवठा कमी होत आहे. यामध्ये शेतकरी मात्र भरडला जात आहे. तालुक्‍यामध्ये बोगस खत प्रकरण ताजे असतानाच आता खतांची टंचाई झाल्याने शेतकऱ्यांसाठी मात्र "दुष्काळात तेरावा' अशीच परिस्थिती झाली आहे. 

इतर खतांची होतेय सक्ती 
युरिया खत घ्यावयाचे असेल तर गरज नसताना इतर कंपन्यांची खते शेतकऱ्यांना घ्यावी लागतील, असे काही दुकानदार सांगत आहेत, असे येथील शेतकरी तुकाराम खाटमोडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

खतांच्या टचाईच्या या काळात लहान शेतकऱ्यांची मात्र ससेहोलपट होत आहे. याकडे कृषी खात्याने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे शेतकरी वामनराव मोरे पाटील यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT