सोलापूर

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात उपोषण 

भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या विरोधात आता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही उपोषणाचे हत्यार उपसले आहे. परांडा तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी आज येथील तहसील कार्यालायासमोर थकीत एफआरपी मिळावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम या भागातील अनेक शेतकऱ्यांनी गत हंगामात (2018-19) भाजप नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित असलेल्या सिताराम महाराज साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. कारखान्याने पंधरा दिवसात एफआरपीची रक्कम देतो, असे सांगून या भागातील सुमारे दोन हजार टनाहून अधिक ऊस गाळपासाठी आणला आहे. परंतु कारखान्याने या भागातील शेतकऱ्यांना अद्याप एक दमडी दिला नाही. 

थकीत एफआरपीची रक्कम मिळावी या मागणीसाठी पंढरपूर, मोहोळ, माळशिरस या भागातील शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. त्यानंतर मंगळवार (ता. 28) पासून भूम, परांडा या भागातील शेतकऱ्यांनीही थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोरच बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

दरम्यान, आज दुपारी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेवून उपोषणाला पाठिंबा दिला. कारखान्याकडील एफआरपीची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना कायम शेतकऱ्यांसोबत आहे, असे आश्वासन श्री. हळणवर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. मागील महिन्यात महसूल प्रशासनाने कारखान्याची 10 कोटी 57 लाख रुपयांची साखर विक्री केली आहे. परंतु न्यायालयाने पुणे येथील युनियन बॅंकेला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांवर पैसे मिळवण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT