Father s funeral stopped for son hsc examination
Father s funeral stopped for son hsc examination sakal
सोलापूर

HSC Exam 2023 : मुलाच्या परीक्षेसाठी वडीलाचा अंतविधी थांबविला

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : तालुक्यातील हुलजंती येथे आज सकाळी आकस्मिक निधन झालेल्या वडीलाचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठवले, पेपर संपल्यानंतर वडिलांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील हुलजंती येथील कल्लाप्पा आबा रूपटक्के वय 60 यांचे अकस्मात आज स.8 वाजता निधन झाले. त्यामुळे घरात दुःखाचा डोंगर पसरला अशा परिस्थितीत सर्व नातेवाईक दुपारच्या सत्रात अंत्यविधी करण्यासाठी जमा झाले.

दरम्यान मुलगा तुकाराम याचा बारावी गणित विषयाचा आज पेपर सोड्डी येथील एम.पी मानसिंगका विद्यालय येथे असल्याचे समजले त्यामुळे या दुःखद प्रसंगी वडिलांच्या निधनामुळे पेपरला गैरहजर राहून त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हुलजंती येथील गोविंद भोरकडे व ग्रामस्थांनी एकत्र येत त्याला परीक्षेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.

त्याबाबत प्राचार्य बसवराज कोरे यांना हा प्रकार कानावर घातला त्याचा बारावीचा पेपर होईपर्यंत वडिलांचा अंत्यविधी दुपारी दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे वडिलांचा मृतदेह घरात ठेवून जड अंतकरणाने त्याला परीक्षेसाठी जावे लागले. या घटनेने या परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केले जात आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT