Ropale Budruk 
सोलापूर

सावधान ! लग्न समारंभांतील "धंदाडाक तताडाक'च्या निनादात कोरोनाचे स्वागत तर होत नाही ना?

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : "पोलिसांची गाडी आली रेऽऽऽ, सर्वांनी मास्क लावा... मास्क लावा !' एका लग्न समारंभातील या प्रसंगामुळे सर्वांचीच धांदल उडाली. मात्र मास्क पोलिसांच्या भीतीने घालायचा का आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, शहरी व ग्रामीण भागातही पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोक काळजी घेताना दिसत नाहीत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळता येत नसेल तर किमान मास्क तरी घालावा, असे अनेकांना वाटत नाही. त्यामुळे मास्क घालण्यातील हलगर्जीपणामुळे जर कोरोनाचा संसर्ग वाढला तर जनतेला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 

एकूणच, गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाणे टाळता येत नसेल तर किमान गर्दीच्या ठिकाणी मास्क स्वतःहून घालण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. लग्न समारंभात तर वधू-वर पक्षांकडून वऱ्हाडी मंडळींना मास्कचे वाटप होते. मात्र मास्क घालण्यात अनेकजण हलगर्जीपणा करतात. 

सोमवारी (ता. 15) एका लग्न समारंभात प्रत्यक्ष थांबून हा सगळा प्रकार पाहिला. कोणी अनेक दिवस मळलेला मास्क घातला होता तर कोणी मास्क हनुवटीच्या खाली सरकावला होता. नटून- थटून आलेल्या करवल्या तर मास्क घालण्याचे नावच घेत नव्हत्या. लहान पोरं-बाळं मास्कविनाच आईस्क्रीम व गारेगार खात बिनधास्त फिरत होती. बायका आपल्या साडीच्या पदराने तोंड झाकण्याचा प्रयत्न करत होत्या. नवरदेवाच्या मित्रांचा थाट काही वेगळाच होता. कोणी सामाजिक अंतराचा नियम पाळत नव्हतं, ना मास्क घालत होतं. त्यांची पावल थिरकत होती ती केवळ उन्हाने कडक झालेल्या हलगीच्या कडकडाटावर. ना सनई ना चौघड्याचे मंगल स्वर... फक्त "धंदाडाक तताडाक... धंदाडाक तताडक...'च्या ठेक्‍यावर तरुणाई नाचून नाचून घामेघूम झाली होती. 

थोडावेळ वाटलं कोरोना संपला आता. तेवढ्यात वऱ्हाडातील एकाने "पोलिस गाडी आली रेऽऽऽ सर्वांनी मास्क लावा...' असे सांगताच वाटले, कोरोनाची भीती गेली असली तरी कोरोना अजून संपला नाही. 

एवढ्या माणसांत मास्क घालायची लाज वाटते ! 
दरम्यान, आम्ही वऱ्हाडी मंडळींना सर्वांना नवीन मास्क वाटले. मात्र अनेक जणांनी मास्क घातलेच नाहीत. त्यामुळे आमचा मास्कचा खर्च वाया गेला, असे वर पक्षाकडील एका कार्यकर्त्याने सांगितले. तर एवढ्या मोठ्या माणसांच्या गर्दीत मास्क घालायची लाज वाटते, असे एका महिला वऱ्हाडीने सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT