ativrushti.jpg 
सोलापूर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई द्या : संभाजी ब्रिगेडची मागणी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः जिल्हाभरात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी संभाजी बिग्रेडने शासनाकडे केली आहे. 

यंदाच्या वर्षी पावसाने संपुर्ण राज्यामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे. गत वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरी 102 टक्के असल्याचे हवामान तज्ञांकडून अंदाज वर्तवण्यात आलेला होता. 

वास्तविक हवामान तज्ञांच्या अंदाजापेक्षा हि अधिक पाऊस सर्वत्र पडलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच अपेक्षे पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. परतीच्या पावसाने संपुर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे सुमारे तीस हजार हेक्‍टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका सुमारे पन्नास हजार शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच आठ जणांचा बळी गेला आहे. 
या पावसामुळे सोलापुर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सगळ्याच तालुक्‍यांमध्ये शेतीमधील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेवगा, डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांबरोबर ऊस, सोयाबिन,मका आदी पिकांसह पालेभाज्यांना हि मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. 
तसेच सोलापूर शहरांतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने बाधित कुटुंबांना अर्थिक मदत द्यावी. 
सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा. पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्यात यावेत. पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई सरसकट सर्व पिकांसाठी देण्यात यावी. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाच्या वारसास भरीव आर्थिक मदत मिळावी. 
शहरातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य चे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी. परिस्थितीचे गांर्भीय ओळखून शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी आदी मागण्या या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूरचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सोमनाथ पात्रे, संघटक महेश गुब्याड उपस्थित होते  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT