crime.jpg 
सोलापूर

घाट दुर्घटना प्रकरणात ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल 

अभय जोशी

पंढरपूरः येथील चंद्रभागा तीरावरील घाटाची भिंत कोसळून सहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाट बांधणी कामाचे ठेकेदार अशोक भागवत इंगोले, हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्‍शन बीड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर घाट सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. हे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळेला करण्यात आल्या होत्या. माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी उपोषण करून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

दरम्यान हे काम सुरू ठेवण्यात आले होते. काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा घाटा लगत सुमारे पंधरा ते वीस फूट उंचीची घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोळी बांधवांसह स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
या फिर्यादी तसे नमूद करण्यात आले आहे की, यातील आरोपी यांनी चंद्रभागा नदी लगत कुंभार घाट पंढरपुर येथे घाट निर्मितीचा ठेका घेतला आहे. त्या कामावर यातील फिर्यादी व साक्षीदार हे देखरेख करत होते. त्यावेळी त्यांनी यातील आरोपी ठेकेदार यांना घाट भिंतीचे उंची जास्त असलेने त्यांना आवश्‍यक सुरक्षा कठडे ,दर्शक फलक बोर्ड ,रेलिंग ग्रील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत व उर्वरित राहिलेले बांधकाम पूर्ण करणे बाबत लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. परंतु तरीही त्यांनी त्यात 
हलगर्जीपणा केल्यामुळे मंगेश गोपाळ अभंगराव वय 30 , गोपाळ लक्ष्मण अभंगराव वय 70, राधा गोपाळ अभंगराव वय 60 तिघे रा कुंभार घाट पंढरपूर संग्राम उमेश जगताप वय 14 रा भडीशेगाव ता.पंढरपुर, आणि अन्य दोन अनोळखी महिला यांचे अंगावर घाट बांधकामाची भराव केलेले दगडे,चुना,माती,वाळू कोसळून त्याखाली दबून त्यांचे सर्वांचे मृत्यूस व घाट बांधकामाचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत. अशा आशयाची फिर्याद जलसंपदा विभागाचे सुदीप गोपाल चमारिया (वय 20 धंदा- नोकरी राहणार-103 समृध्दी हेरिटेज जुळे सोलापूर ) यांनी दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक श्री. करे हे पुढील तपास करीत आहेत.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT