सोलापूर

पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती भरा ऑनलाइन 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) ऍपद्वारे आणि customer.service@bhartiaxa.com या ईमेलवर किंवा तालुका कृषी कार्यालयात नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स हे ऍप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे. या ऍपपद्वारे शेतकऱ्यांनी भरलेली नुकसानीची माहिती प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विमा प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला सादर करतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन श्री. माने यांनी केले आहे. 
तालुकानिहाय विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. अक्कलकोट (दशरथ यळसंगे-8788268798), दक्षिण सोलापूर (अजित सावंतराव-9175020091), उत्तर सोलापूर (नागेश भरडे-8788798766), मोहोळ (संदीप कीपनर-9511935999), पंढरपूर (विष्णू गायकवाड-9146868127), मंगळवेढा (बसवराज सुतार-860554177), सांगोला (चेतन खटकाळे-9665698566), माळशिरस (उमेश पळसे-7083697172), बार्शी (किशोर वळसे-9960997899), माढा (आकाश नवसारे-9665283814) आणि करमाळा (अक्षयकुमार रेगुडे-8459601881). शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची माहिही ऍपद्वारे भरली तर त्यांना नुकसानीची मदत मिळणे सोईस्कर होणार आहे. त्यामुळे पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पिकांची माहिती ऍपवर भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT