finally sharad pawar on thursday farmers melava at Kapsewadi madha solapur
finally sharad pawar on thursday farmers melava at Kapsewadi madha solapur Sakal
सोलापूर

Solapur News : अखेर शरद पवार यांचा गुरुवारी; कापसेवाडी येथे शेतकरी मेळावा

वसंत कांबळे

कुर्डू : कापसेवाडी ता माढा येथील कृषीनिष्ठ परिवाराच्या वतीने गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता द्राक्ष , बेदाणा , टाेमॅटाे व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेन्या साठी संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरदचंद्र पवार हे स्वतः उपस्थित राहणार असल्याने या आधी रद्द झालेला कार्यक्रम अखेर हाेनार असल्याने जिल्ह्यात पुन्हा चर्चचा विषय झालेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर माढा तालुक्यात व जिल्ह्यात होणाऱ्या त्यांच्या पहिल्याच दौऱ्याकडे द्राक्ष व बेदाणा फळ बागायतदारां बरोबरच राजकीय नेत्यांचेही लक्ष लागून राहिले आहे. २३ ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेला येथील शेतकरी मेळावा अचानकपणे रद्द झाल्या नंतर पुन्हा त्याच ठिकाणी एका महिन्याच्या आत हा मेळावा होत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

कृषीनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांच्या प्रयत्नातून द्राक्ष उत्पादक व बेदाणा याचबरोबर टोमॅटो दूध उत्पादक यासारख्या फळभाज्यांच्याही शेतकऱ्यांसाठी हा मेळावा या उत्पादनांना चांगला दर मिळावा म्हनून विशेष करून आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला सोलापूर, उस्मानाबाद व सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित राहणार आहेत त्या दृष्टीने कापसेवाडी येथील कृषीनिष्ठ नितीन कापसे यांच्या द्राक्षाच्या मळ्यात या शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

२३ ऑक्टोंबर रोजीही द्राक्ष बागायतदारांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.परंतु त्यावेळी तो रद्द झाल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला शेतकरी नाराज झाला होता .याची लागलीच दखल घेत खासदार शरदचंद्र पवार यांनी स्वतः फोन करून नितीन कापसे यांना मुंबईला तातडीने बोलावून मी पुन्हा कापसेवाडीला येणार आहे असे सांगून तारीख सांगा त्या दिवशी येतो असे आश्वासन दिले होते.

यावेळी तुम्हीच पुन्हा एकदा तारीख द्या मी पुन्हा एकदा तयारी करतो असे कापसे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर खा. पवार यांच्याकडून १६ नोव्हेंबर दिवशी मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार त्यांचा दौरा देखील प्रशासना कडे १२ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेला आहे.यामुळे कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

खा.शरद पवारांचा १६ नोव्हेंबर रोजी फक्त कापसेवाडी दौरा - कापसेवाडी ता.माढा येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या मेळाव्याला १६ नोव्हेंबर रोजी खा.शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थितीत राहणार असल्याचे मागील आठवड्यात जाहीर झाल्या नंतर त्यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात पंढरपूर व सोलापूर येथील काही कार्यक्रम नियोजित झाले होते.

परंतु त्यांच्या दौऱ्यात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी बदल झाला असून फक्त कापसेवाडी ता. माढा येथील शेतकरी मेळाव्यालाच ते हेलिकॉप्टरने उपस्थित राहणार असून इतर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT