The financial crisis caused by a lockdown on other state sellers 
सोलापूर

घरच्यांची काळजी वाटतेय आमच्या गावी पाठवा..! 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर अनेक वर्षांपासून येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. खाण्या-पिण्याची समस्या सुरू झाली असून, दळण-वळणाची सुविधा बंद झाल्याने त्यांना त्यांच्या गावाकडेही जाता येईना. "आम्हाला आमच्या घरच्यांची खूप काळजी वाटत आहे, सरकारने आम्हाला आमच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी' अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे. 

मूळचा उत्तर प्रदेशातील झांसी (जिल्हा जालन) येथील पाणीपुरी विक्रेता ग्रंथसिंह ठाकूर म्हणतात, दहा-बारा वर्षांपासून मी येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. रोज दोन-तीन गाड्यांमधून हजार-पाचशे रुपये मिळत होते, त्यातूनच आमचा प्रपंच चालत होता. आम्ही उत्तर प्रदेशहून 40-50 जण कल्याणनगर येथे आहोत, तर इतर शहरातील संख्या 500 ते 600 आहे. आता लॉकडाऊनपासून घराबाहेर पडलो नाही. खाण्या-पिण्याची व्यवस्था होत नाही. जे शिल्लक राशन होतं ते आता संपलं आहे. शासनाने आम्हाला घरात डांबून ठेवलंय तर आमच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी. 
अशीच व्यथा मूळचा मध्य प्रदेश, जिल्हा भेंड येथील रहिवासी कमलेश राजपूत म्हणाले, आम्ही तीस वर्षांपासून पाणीपुरीचा व्यवसाय करतो. पायाने अपंग आहे. तरी व्यवसाय करतो. घरचे चार सदस्य आहेत. लॉकडाऊनमुळे आमच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खायचे वांदे होत आहेत. शासनाने आम्हाला मदत करावी. 
त्यांची पत्नी अर्चना राजपूत म्हणाल्या, आता पतीचा पाणीपुरीचा व्यवसाय बंद झाल्याने मी भाजी विक्रीसाठी प्रयत्न केला. मात्र लोकं नावे ठेवू लागली, पाणीपुरीवाली भाजी विकते आहे. भाजी विक्रीही होत नसल्याने आता आमची बिकट परिस्थिती झाली आहे. 

लॉकडाऊन झाल्यापासून घरातच आहोत. काहीच राशन शिल्लक नाही. जवळचे पैसेसुद्धा संपले आहेत. एका दुकानदाराकडून दोन हजार रुपये व्याजाने घेतले होते, तेही आता संपले. आता पुन्हा मागायला गेल्यावर कोणी देत नाहीत. गावाकडे मुलगा आहे, सून आहे. इकडे आमचे हाल आहेत अन्‌ तिकडे त्यांचेही हाल होत आहेत. 15 तारखेनंतर आम्हाला आमच्या घरी पाठवा. 
रेखा ठाकूर, झांसी (जिल्हा जालन), उत्तर प्रदेश 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT