Traffic Police 
सोलापूर

अबब..! शहरातील 45 हजार वाहनचालकांनी मोडला नियम..! पोलिसांनी केला "एवढा' दंड

तात्या लांडगे

सोलापूर : शहर व ग्रामीण पोलिसांनी सातत्याने आवाहन करूनही कोरोनाची भीती न बाळगता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 45 हजार बेशिस्त वाहनचालकांवर 10 मार्च ते 6 जुलैपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चार महिन्यांत तब्बल 50 लाखांचा दंड वसूल झाला, तरीही नियमांचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्या वाहनचालकांना स्वयंशिस्त लागली नसल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत आहेत. तरीही नागरिकांना स्वयंशिस्त लागलेली दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या हेतूने पोलिसांनी रिक्षात दोन प्रवाशांना तर दुचाकीवर डबलसीट कोणी नसावा, चारचाकीतही दोनच व्यक्‍ती असाव्यात, असे आदेश काढले. मात्र, बहुतांश वाहनचालक सर्रासपणे या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र शहर-जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट वापरणे बंधनकारक असतानाही कोणाकडेच हेल्मेट दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आता मास्क न घालणे, दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्‍ती तथा तीनचाकी, चारचाकी वाहनात चालकाशिवाय दोनपेक्षा अधिक व्यक्‍ती असल्यास किमान 500 ते 750 रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, लॉकडाउननंतर ग्रामीण भागातील बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. सुमारे 23 हजार वाहनचालकांकडून 23 ते 25 लाखांचा दंड वसूल केला. आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नव्या आदेशानुसार जिल्हाभरात दंडात्मक कारवाई सुरू आहे. कारवाई होण्यापूर्वी वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. 

ठळक बाबी...

  • नाकाबंदीच्या आठ पॉइंटवर शहर पोलिसांची दररोज सरासरी 350 वाहनांवर कारवाई 
  • शहरात आतापर्यंत 23 हजार वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन; 26 लाखांहून अधिक दंड वसूल 
  • शहर पोलिसांनी तीन हजारांहून अधिक दुचाकी, 200 रिक्षा तर 100 चारचाकी वाहने केली होती जप्त 
  • ग्रामीण पोलिसांकडून सुमारे 22 हजार वाहनांवर कारवाई; 25 लाखांचा दंड केला वसूल 
  • मास्क न घालणाऱ्यास आता 100 रुपयांचा दंड तर डबलसीट वाहनचालकास भरावे लागणार 500 रुपये 
  • दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्यास 750 रुपयांचा दंड; तीनचाकी व चारचाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्‍तींना बंदी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT