Pistol  sakal
सोलापूर

सोलापूर : उपळाईचे सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तूलमधून फायरिंग

डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? या कारणावरून उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तुलमधून फायर

किरण चव्हाण

माढा : डिझेल (Diesel)चोरीचा खोटा आरोप का केला? या कारणावरून उपळाई खुर्दचे (ता. माढा) सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तुलमधून(pistol) फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा माढा पोलिसात दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता. 7) सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी संदीप पाटील हे घरासमोर उभे असताना प्रमोद जाधव, विनोद जाधव, सुवर्णा जाधव, कौशल्या जाधव ( सर्व रा. शिंदेवाडी, ता. माढा) व आनंद बारबोले, तनुजा बारबोले (रा. दारफळ ता. माढा) हे आले व त्यांनी फिर्यादी संदीप पाटील यांना तुम्ही प्रमोदवर डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला, असे म्हणून शिवीगाळ करू लागले.

त्यावेळी संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील व समाधान पाटील यांनी आरोपींना उद्देशून तुम्ही संदीप पाटील यांना शिवीगाळ का करता अशी विचारणा केली. त्यावेळी महिलांनी हाताने व लाथा - बुक्क्यांनी तर प्रमोद जाधव याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने संदीप पाटील यांच्या भावकीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संदीप पाटील सोडविण्यासाठी मध्ये गेले असता विनोद जाधव हा संदीप पाटील यांच्या अंगावर धावून गेला व आनंद बारबोले याने त्याच्या जवळील पिस्तुल काढून संदीप पाटील यांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने रोखले व तुला खलास करतो असे म्हणून फायर केला. या प्रकरणी सर्वांना अटक केली असून या घटनेचा तपास करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा करत आहेत.(Solapur news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT