farmer 
सोलापूर

बळीराजासाठी गूड न्यूज : कर्जमाफीची पहिली यादी 15 फेब्रुवारीला... पण

तात्या लांडगे

सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील बळीराजाला दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. त्यासाठी सुमारे 32 लाखांपर्यंत शेतकरी त्यासाठी पात्र ठरले असून त्यामध्ये जिल्हा बॅंकांच्या 17 लाख कर्जदारांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची रक्‍कम व आधार क्रमांकातील त्रुटींचा शोध घेण्यासाठी कर्जमाफीची पहिली यादी 15 फेब्रुवारीला प्रसिध्द केली जाणार आहे. 


दुष्काळ, नापिकी, अवकाळी, गारपीट यासह अन्य नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या हालचाली युध्दपातळीवर सुरु आहेत. मागील सरकारने दिड लाखांची कर्जमाफी केली परंतु, ऑनलाइनमुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. आता महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, मागील कर्जमाफीतील अडचणींचा विचार करुन ऑफलाइन कर्जमाफीचा निर्णय घेतला. बॅंकांकडून गेलेल्या याद्यांनुसार लाभ मिळेल, असा विश्‍वास बळीराजाला होता. परंतु, अंगठ्याचा ठसा देण्यासाठी व कर्जाची रक्‍कम व आधार क्रमांक बरोबर आहे की नाही, याची खात्री करण्याकरिता बळीराजाला पुन्हा आपले सरकार सेवा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागणार आहेत. महसूल व सहकार विभागांच्या कार्यालयाबाहेर कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द केल्यानंतर त्याचे वाचन केले जाणार आहे. त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय त्यांना लाभ मिळणार नाही, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. 


त्रुटींच्या पूर्ततेसाठी जावे लागणार ऑनलाइन केंद्रांवर 
कर्जमाफीची पहिली यादी 15 दिवसांत प्रसिध्दी होईल, तसे नियोजन आहे. त्यानुसार संबंधित पात्र शेतकऱ्यांची रक्‍कम, आधार क्रमांकाबद्दलच्या त्रुटींची पूर्तता केली जाणार आहे. त्रुटींच्या पूर्ततेसाठी संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाइन केंद्रांवर जावे लागणार आहे. ज्यांच्या रकमेचा अथवा आधार क्रमांकाचा आक्षेप आहे, त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेतील. 
- डॉ. आनंद जोगदंड, अप्पर आयुक्‍त, सहकार 


ठळक बाबी... 

  • जिल्हा बॅंक अन्‌ राष्ट्रीयीकृत बॅंकांचे एकूण 29 लाख लाभार्थी 
  • अंगठ्याच्या ठशासाठी (थंब इम्प्रेशन) लाभार्थ्यांना जावे लागणार आपले सरकार सेवा केंद्रांवर 
  • आधार प्रमाणिकरण झाल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ 
  • कर्जाची रक्‍कम व आधार क्रमांकावरील आक्षेपावर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम 
  • याद्या प्रसिध्द झाल्यानंतर लाभार्थ्यांना पडताळावी लागणार कर्जाची रक्‍कम व आधार क्रमांक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT