The five year girl of the accident in Velapur survives 
सोलापूर

दैव बलवत्तर म्हणून पाच वर्षाची सई सुखरुप

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : देव दर्शनासाठी निघालेल्या वैराग (ता. बार्शी) येथील फलफले कुटुंबियावर आज सकाळी वेळापूर जवळ काळाने घाला घातला. टॅंकर आणि कारच्या अपघातामध्ये कारमधील सहा जणांचा दु्दैवी मृत्यु झाला. यामध्ये दैवबलवत्तर म्हणूकी काय सई दिनानाथ फलफले ही पाच वर्षाची चिमुकली बाचवाली आहे. या अघातामध्ये तीच्या वडीलांचा जागेवरच मृ्त्यु झाला तर आई पूजा दिनानाथ फलफले (वय 30) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
फुलफले कुटुंबिय आज पहाटे वैरागहून कारमधून सहकुटुंब पंढरपूरच्या विठ्ठलाचे आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी पंढरपुरात आल्यानंतर विठ्ठल दर्शन घेतले. त्यानंतर ते वेळापूर मार्गे जेजुरीकडे मार्गस्थ झाले. सकाळी आठ वाजणेच्या सुमारास वेळापूरच्या जवळ पिसेवाडी पाटीजवळ समोरुन येणाऱ्या सिमेंट टॅंकरने त्यांच्या कारने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारगाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. यामध्ये पाचजणांचा जागीचा मृत्यु झाला तर पार्वती महादेव फलफले (वय 75) यांचा उपाचारा दरम्यान मृत्यु झाला. इतक्या भीषण अपघातातून सई दिनानाथ फलफले ही पाच वर्षाची चिमुकली दैवबलवत्तर म्हणून बालंबाल बचावली. यामध्ये तीची आई पूजा ही गंभीर जखमी असून तिचीही मृत्युशी झुंज सुरु आहे. फलफले कुटुंबिय हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. अमोप्रकाश शेटे यांचे जवळच नातलग असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर टॅंकर चालक पळून गेला आहे. त्यामुळे अपघात कसा झाला याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत. अघाताची माहिती मिळताच वेळापूर व पिसेवाडी येथील स्थानिक लोकांनी जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यासाठी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT