सोलापूर

हैदराबाद व सोलापूरचे पाच तरूण निघाले रतन टाटांकडे...

राजकुमार शहा

मोहोळ : लॉकडाउनच्या काळात आम्ही काय खावे, आमची बायका, मुले कशी सांभाळावी, आम्ही कायम कामगार आहोत, आमची रोजीरोटी बंद पाडू नका अशा अडचणी ची कैफियत घेऊन हैदराबाद येथील चार व सोलापूर (Hyderabad and Solapur)येथील एक असे पाच तरुण हैदराबाद ते मुंबई (Hyderabad to Mumbai)असा सातशे किलोमीटरचा पायी प्रवास करत टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा(Ratan Tata) यांना भेटण्यासाठी निघाले आहेत.

हैदराबाद येथे टाटा उद्योग समूहाचा विमान निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात हे पाचही कामगार गेल्या आठ ते दहा वर्षापासून काम करतात. शंतनु कुमार दास, दिव्य प्रताप महंता, सय्यद मुल्ला, अशोक सोनकंटली सर्व रा हैदराबाद तर मल्लिकार्जुन म्हंता हा सोलापूरचा आहे अशी त्यांची नावे आहेत. 25 ते 30 वयोगटातील हे पाच तरुण 4 जानेवारी रोजी हैदराबाद हून हातात रतन टाटा यांचे डिजिटल फोटो घेऊन निघाले आहेत. थंडी,वारा यांची तमा न बाळगता रस्त्यात काय मिळेल ते खाणे, कोणी मदत केली तर ती स्वीकारणे, रात्री धर्मशाळा, पेट्रोल पंप अशा ठिकाणी झोपणे व सकाळी उठून पुन्हा प्रवास असा त्यांचा दिनक्रम आहे.

यावेळी मल्लिकार्जुन म्हंता म्हणाला, आमच्या सारख्या 100 ते 110 कामगारांना लॉक डाऊन च्या अगोदर व नंतर ही कामावरून कमी केले आहे. लॉक डाऊन चे कारण देत आमच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला कामावरून कमी करतात व नवीन कामगार भरती करतात हा भेदभाव कशासाठी. मात्र टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांच्यापर्यंत हा विषय गेला की नाही की खालच्या व्यवस्थापनाचा हा कारभार आहे, त्यासाठी खरी वस्तुस्थिती टाटा यांना भेटून सांगण्यासाठी आम्ही निघाल्याचे त्यांनी सांगितले. रतन टाटा म्हणजे "मजदूरों का मसीहा" आहेत आम्हाला नक्की न्याय मिळेल अशी आशा असल्याचे म्हंता यांने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT