karad sakal
सोलापूर

७ तालुक्यांतील १०५ गावांना पुराचा धोका! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ८ लाखांच्या रबर बोटी

उजनी व वीर धरणातून भीमा व नीरा नदीत पाणी सोडले जाते. त्यावेळी जिल्ह्यात सात तालुक्यांमधील नदी काठावरील १०५ गावांना नेहमीच पुराचा तडाखा बसतो.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण क्षेत्रात जुलै ते ऑक्टोबर या काळात भरपूर पाऊस पडतो. उजनी व वीर धरणातून भीमा व नीरा नदीत पाणी सोडले जाते. त्यावेळी जिल्ह्यात सात तालुक्यांमधील नदी काठावरील १०५ गावांना नेहमीच पुराचा तडाखा बसतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येकी एक लाखाच्या आठ रबर रेस्क्यू बोटी खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे एक कोटी २२ लाखांचा निधी मागितला आहे.

उजनी धरण हाउसफुल्ल झाल्यानंतर भीमा नदीतून मोठा विसर्ग सोडला जातो. त्याचवेळी वीर धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाते. दोन्ही धरणातील पाण्यामुळे भीमा व नीरा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागतात. त्यावेळी नदी काठावरील गावे पाण्याखाली जातात आणि तेथील लोकांचा जीव वाचविण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेला मदत करावी लागते. रात्रीच्यावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी त्या यंत्रणेला पाण्यात उतरावे लागते. त्यासाठी सर्च लाईट, लाइफ बोट, सेफ्टी हेल्मेट, मेगाफोन, फ्लोटिंग पंप आणि रबरी रेस्क्यू बोटींची गरज भासते. त्यासाठी राज्य सरकारने एक कोटी २२ लाख रुपये द्यावेत, जेणेकरून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी मोठी मदत होईल, असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, सांगोला या तालुक्यांसाठी प्रत्येकी एक तर अक्कलकोट तालुक्यासाठी दोन रबर रेस्क्यू बोटी दिल्या जातील. निधी मिळाल्यानंतर प्रत्येकी नऊ हजारांचे ३१ मेगाफोन, २० हजार रुपयांच्या एकूण ६५ फ्लोटिंग पंपांची खरेदी केली जाणार आहे.

पूर आल्यावरच मिळणार का निधी?

जिल्ह्यात मागच्या वर्षी पुरामुळे पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीची पाहणी केली होती. यंदाही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रतिबंधित उपायांसाठी १ जून रोजी शासनाकडे निधी मागितला आहे. २४ दिवस झाले, पण एक दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे पूर आल्यावर की पुरात मोठी वित्त व जीवितहानी झाल्यावर निधी मिळेल, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Rain Accident : ठाण्यात मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पाण्यात करंट उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Khadakwasala Dam Water : पुणेकरांसाठी दिलासादायक! खडकवासला धरण साखळीत पाणी वाढले; पाणलोट क्षेत्रात पावसाने धरला जोर

Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

Sindhudurg Rain Alert : सिंधुदुर्गात वरुणराजाचा हाहाकार! 'ऑरेंज अलर्ट'मुळे पूरस्थिती निर्माण होणार? NDRF चं पथक दाखल, समुद्रही खवळला, किनाऱ्याला धडकताहेत अजस्र लाटा

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT