Footprints of a taras animal have been found in Mahud village.jpg
Footprints of a taras animal have been found in Mahud village.jpg 
सोलापूर

तो' हिंस्र प्राणी बिबट्या नव्हे तर तरसच ! वनविभागाचा खुलासा

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूद परिसरात शनिवारी बिबट्या दिसल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र पायाचे ठसे व वर्णन पाहता नागरिकांनी पाहिलेला प्राणी तरस असल्याने लोकांनी घाबरू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
महूदच्या उत्तरेला असणाऱ्या ठोंबरेवाडी, कोळेकरवस्ती, येडगेवाडी, कारंडेवाडी (महिम) या भागात शनिवारी सकाळी येथील नागरिकांनी बिबट्या पाहिल्याची चर्चा सर्वत्र पसरली. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी धनंजय देवकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. ठोंबरेवाडी, कोळेकरवस्ती येथील स्थानिकांशी त्यांनी चर्चा केली. स्थानिकांनी बोलताना तांबूस रंगाचा प्राणी पाहिल्याचे सांगितले. त्याच्या पावलांच्या ठशांचे निरीक्षणही केले. त्याच्या पावलांचा माग काढत ते कारंडेवाडी (महिम) हद्दीपर्यंत गेले होते. काही उभ्या पिकांमध्ये व ऊसामध्ये ही या प्राण्याचा शोध घेण्यात आला. मात्र लोकांनी वर्णन केलेला प्राणी कोठेही आढळून आला नाही. त्याच्या पावलांच्या ठशांवरून व प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलेल्या त्याच्या वर्णनावरून हा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले.

मोहोळमध्ये गाळपाविना दीड लाख टन ऊस; चार कारखाने कार्यरत
 
ठोंबरेवाडी, येडगेवाडी, कोळेकरवस्ती, कारंडेवाडी (महिम) या भागात ऊसाचे व इतर पिकांचे क्षेत्र जास्त आहे. काही ठिकाणी दाट झाडीसुद्धा आहे, तर काही ठिकाणी मोकळे माळरानही आहे. त्यामुळे हा परिसर जंगली प्राण्यांसाठी सुरक्षित आहे. त्यातच बिबट्या दिसल्याच्या अफवेने स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसभर येथील शेतकऱ्यांनी शेतात जाण्याचे टाळले आहे. 

सकाळी लवकर वैरण आणण्यासाठी गेलो असताना मला विहिरीच्या खालच्या बाजूला तांबड्या रंगाचा प्राणी दिसला. मला पाहताच तो मकेच्या पिकात शिरला. त्याला पाहून मीही घाबरलो होतो. मात्र तो कोणता प्राणी आहे, हे मला नेमके माहित नाही. 
- पोपट ठोंबरे, ठोंबरेवाडी, महूद 

पावलांचे ठसे व वर्णनावरून लोकांनी पाहिलेला प्राणी हा तरस होता. तरस माणसावर हल्ला करत नाही. त्यामुळे धोका नाही, तरीही रहिवाशांनी लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये. या भागात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून रात्रीच्या वेळेस फटाके फोडून या प्राण्याला हुसकावून लावण्यात येईल. 
- धनंजय देवकर, वनाधिकारी, सांगोला
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT