सोलापूर

Solapur : काँग्रेसनं गमावला आणखी नेता; सलग सातवेळा खासदार झालेल्या नेत्याचं निधन

1977 साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे पेशानं वकील होते.

Sandipan Thorat Passed Away : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून (Pandharpur Lok Sabha Constituency) सलग सातवेळा निवडून गेलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान भगवान थोरात (वय 91) यांचं काल शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजारानं निधन झालं.

त्यांच्या पश्चात वृध्द पत्नीसह चार विवाहित पुत्र, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून थोरात यांच्यावर सोलापुरातील (Solapur) खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान काल (31 मार्च) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या (Sandipan Thorat) निधनानं राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. अलिकडं राजकारणापासून दूर राहिलेल्या थोरात यांना गेल्या अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकारानं ग्रासलं होतं. सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे पेशानं वकील होते.

ते तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. 1977 साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती, तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Love Horoscope: प्रेमात मनापासून साथ देतात! ‘या’ ५ राशींचे लोक जोडीदारासाठी असतात कायम खास

SCROLL FOR NEXT