ZP Canva
सोलापूर

"झेडपीतील लकवा मारलेल्या हातांना "पाकीट'रूपी औषध मिळालं की फायलींवर तत्काळ सह्या होतात !'

माजी आमदार राजन पाटील म्हणाले की पैसे दिल्याशिवाय जिल्हा परिषदेत फायलींवर सह्या होत नाहीत

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेत (Solapur Zilha Parishad) भ्रष्टाचार (Curruption) बोकाळला असून, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार होत आहे. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या हाताला लकवा मारला गेला आहे. लकवा मारलेल्या हातांना "पाकीट'रूपी औषध मिळाले की तत्काळ फायलींवर सह्या होत असल्याचा आरोप माजी आमदार राजन पाटील (Former MLA Rajan Patil) यांनी केला आहे. (Former MLA Rajan Patil said that files are not signed in the Zilla Parishad without payment)

माजी आमदार राजन पाटील म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना काय करावे काहीच कळत नाही. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे रोजगार बुडाला. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. अशा काळात खुर्चीला चिकटलेले अधिकारी आणि पदाधिकारी मात्र सर्वसामान्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून आपल्याच झोळ्या भरून घेण्याचे काम मात्र नेटकेपणाने करीत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. परंतु वेळेत कामे करून विकासाला गती देण्याच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

विकास कामांच्या फायली पैशासाठी अडविल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे जिल्ह्यातील मानाचे पद आहे. त्यामुळे अध्यक्षांनी लक्ष देऊन विकासाला गती देण्याची आवश्‍यकता आहे. असे असताना देखील अध्यक्षांबरोबरच प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्याही हाताला लकवा मारला गेला आहे. अनेक महत्त्वाच्या विकासकामांच्या फायलींवर वेळेवर सह्या होत नाहीत. लकवा मारलेल्या हातांना औषधरूपी पाकिटं मिळाली की तत्काळ फायलींवर सह्या होतात, असा आरोप राजन पाटील यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

SCROLL FOR NEXT