Corona 
सोलापूर

जिल्ह्यातील "हे' ज्येष्ठ नेते व त्यांचे बंधूही निघाले कोरोना पॉझिटिव्ह

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार यांना आणि त्यांचे बंधू अशा दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्या दोघांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच दोघाही बंधूंना दक्षता म्हणून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कायम लोकांच्या संपर्कात असणाऱ्या या माजी आमदारांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेतली होती. परंतु तरीही त्यांना संसर्ग झालाच. त्यांचे बंधू तथा आमदार यांचे वडील यांनाही दोन दिवसांपूर्वी लक्षणे दिसू लागल्याने कुटुंबीयांनी दोघांचीही तातडीने रॅपिड अँटिजेन टेस्ट करवून घेतली होती. दोघांचेही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने दक्षता म्हणून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती व्यवस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडून आलेल्या अहवालात पंढरपूर शहरातील 36 तर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील 31 अशा एकूण 67 नवीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्‍याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक भोसे येथे 21 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याशिवाय खेड भोसे येथील सात, शेगाव दुमाला येथील दोन तर 
आढीव, करकंब, लक्ष्मी टाकळी, मेंढापूर, पिराची कुरोली, रोपळे येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

पंढरपूर शहरात जुना सोलापूर नाका परिसर व जुनी पेठ भागातील प्रत्येकी चार, कोळी गल्ली, नाथ चौक, के. बी. पी. कॉलेजजवळ, सावता माळी मठ, वीर सागर नगर या भागातील प्रत्येकी दोन तर अनिल नगर, गांधी रोड, इंदिरा गांधी भाजी मार्केट, जुना कराड नाका, लिंक रोड, महाद्वार, महात्मा फुले नगर, नागपूरकर मठ, एम. एस. ई. बी. जवळ, रामबाग, संतपेठ, सावरकर नगर, उमदे गल्ली या भागातील प्रत्येकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ७ दिवस पाणीकपात होणार; कोणत्या भागांना फटका बसणार?

राजा शिवाजी सिनेमात रितेशच्या धाकट्या लेकाने साकारलीये भूमिका ! ट्रेलरमध्ये दिसली झलक

Latest Marathi News Live Update : अकोला नाका ते राजाकिन्ही हा मुख्य रस्त्यावर धोका वाढला; दिवसभर वाहतूक कोंडी

LPG Cylinder News: घरगुती गॅस सिलिंडर वितरणासाठी समान निकष लागू करा; भेदभावपूर्ण धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

भेंडवळच्या अंदाजाला श्याम मानव यांचं आव्हान, ९० टक्के अचूकता सिद्ध केल्यास ८० लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT