Online Fraud Canva
सोलापूर

ऑनलाइन फसवणूक ! नोकरी, कर्जाच्या आमिषेला शहरातील तरुण बळी

सोलापुरातील तरुणांची साडेचौदा लाखांची ऑनलाइन फसवणूक

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना (Covid-19) काळात अनेकांची नोकरी गेली. अनेक सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत. दुसरीकडे, अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे सावज शोधून सायबर गुन्हेगार त्यांना आमिषेच्या जाळ्यात ओढू लागले आहेत. जानेवारी ते 16 मे 2021 या काळात शहरातील 60 जणांची तब्बल 14 लाख 51 हजार 521 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (Fourteen and a half lakh online fraud of youth in Solapur city)

तुम्हाला नोकरी हवी आहे का, तुमची जॉबसाठी निवड झाली असून प्रशिक्षणासाठी एवढे पैसे ऑनलाइन भरा, तुम्हाला कर्ज हवे आहे का, तुमच्या विम्याचा हप्ता थकला आहे, तुम्ही लकी ड्रॉमध्ये विजेते ठरले असून तुमचे बक्षीस घेण्यासाठी एवढे पैसे भरा... अशा प्रकारची वेगवेगळी आमिषे दाखवून ज्येष्ठ नागरिक, तरुण व नोकरदारांची फसवणूक केली जात आहे. तत्पूर्वी, त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून अथवा कॉल करून त्यांच्या बॅंकेबद्दलची माहिती घेतली जात आहे. गरजेपोटी काहीजण आमिषेला बळी पडले असून, त्यांना सायबर गुन्हेगारांनी जबर दणका दिला आहे.

त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस शाखेतील सायबर सेलकडे धाव घेतली आहे. दुसरीकडे, अनेकजण आपण एवढे शिकूनही फसवणूक झाल्याचे लोकांना समजायला नको म्हणून गप्पच बसल्याचेही समोर आले आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यातील एका तरुणाला नोकरीसाठी निवड झाल्याचे सांगून 12 हजाराला गंडविल्याचीही घटना काही दिवसांपूर्वी घडली. मात्र, त्या तरुणाने पालकांच्या परस्पर ऑनलाइन रक्‍कम समोरील व्यक्‍तीला पाठविली होती. त्याची माहिती झाल्यावर पालक ओरडतील म्हणून पोलिसांत धाव घेतली नाही.

कोरोना काळात बहुतांश तरुणांचा जॉब गेला. अनेकजण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांना आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर असे तरुण, ज्येष्ठ नागरिक, नोकदार ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू लागले आहेत. मोबाईलवर आलेला कॉल अथवा मेसेज, लिंकबाबत खबरदारी घ्यावी.

- विसेंद्रसिंग बायस, पोलिस उपनिरीक्षक, सायबर सेल

जानेवारी 2021 नंतरची फसवणूक

तक्रारीचे एकूण अर्ज : 60

फसवणुकीची रक्‍कम : 14,51,521

पोलिसांकडून वसुली : 16,160

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT