saloon1.jpg
saloon1.jpg 
सोलापूर

सलूनमध्ये प्रत्येक ग्राहकांच्या कोरोना सुरक्षेचा खर्च तब्बल चाळीस रुपये 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः शहरात सलून व्यावसायिकांनी सलून उघडल्यानंतर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक ग्राहकासाठी लागणार्या कोरोना सुरक्षा साहित्याचा खर्च 40 रुपयांनी इतका होत आहेच. त्यामूळे आता कटिंगचे दर 120 रुपयांवर पोचले आहेत. 

मागील काही दिवसांपासून सलून व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात मागणी केल्यानंतर शासनाकडून व्यवसायासाठी परवानगी मिळाली. मात्र, ग्राहक व कारागिरांची कोरोना संसर्गापासून सुरक्षा होणे महत्त्वाचे होते. त्यासाठी अनेक कारागिरांनी युज अँड थ्रोचे ऍप्रन प्रत्येक ग्राहकाला देण्याचे काम सुरू केले आहे. यासोबत दुकानावर ग्राहकाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनरदेखील वापरत आहेत. प्रत्येक कटिंगनंतर सॅनिटायझरने खुर्ची पुसून घेतली जात आहे. ग्राहकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतर प्रवेश दिला जात आहे. हॅंडग्लोव्हजदेखील वापरले जात आहेत. या सर्व साहित्याचा खरेदीचा खर्च प्रत्येक ग्राहकासाठी 40 रुपये एवढा होतो आहे. 

पूर्वी सोलापूर शहरात कटिंगचा दर 80 रुपये एवढा होता. मात्र आता हा सुरक्षा साहित्याचा खर्च वाढल्याने हा दर 120 रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एवढी रक्कम मोजावी लागणार आहे. दर वाढले तरी प्रत्यक्षात ग्राहकासोबत कारागिरांनादेखील कोरोना संसर्गासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दाढी करण्यास परवानगी दिलेली नाही. दाढी का करत नाहीत यावरूनदेखील ग्राहक या व्यावसायिकांशी वाद घालण्याचे प्रकार होत आहे. सोशल डिस्टन्सच्या अटीमुळे एका आड एक खुर्ची वापरावी लागत आहे. कोरोना संसर्गामुळे दुकानात ग्राहकाची गर्दी होऊ नये म्हणून या व्यावसायिक ग्राहकांना मागे पुढे कटिंगची वेळ देऊन गर्दी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

सुरक्षा साहित्याने दरवाढ 
कोरोना संसर्गाची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कटिंगचे दर वाढवणे आवश्‍यक झाले होते. 
संतोष राऊत, अध्यक्ष, श्री संत सेना महाराज नाभिक दुकानदार समाजोन्नती संस्था 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT