Fraud 
सोलापूर

कराराप्रमाणे "या' कंपनीला साखर न पाठवता नऊ लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : समुन्नती ऍग्रो सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीमार्फत करार झाल्यानंतर भारती एंटरप्रायझेस, हैदराबाद यांना 30 मेट्रिक टन साखरेचा पुरवठा न करता नऊ लाख 94 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजय श्रीपती चौगुले (रा. थिपकुर्ली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) व भवानगिरी शुगर एजन्सीचे नवनाथ लालासाहेब नलवडे (रा. शिरभावी, ता. सांगोला) व राजगुंडा (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादी रविराज शिवाजी सूर्यवंशी (रा. माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली) हे समुन्नती ऍग्रो सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीकडे रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत आहेत. भारती एंटरप्रायझेस, हैदराबाद या कंपनीला साखर खरेदी करून पाठवायची असल्याने फिर्यादीने हुतात्मा शुगर टेंडर या मोबाईल व्हॉट्‌सऍपच्या ग्रुपवर माहिती प्रसारित केली. समुन्नती ऍग्रो सोल्यूशन्स या कंपनीचा नवनाथ नलवडे व विजय चौगुले यांच्याशी 30 मेट्रिक टन साखर देण्याचा व्यवहार झाला. ही साखर समुन्नती ऍग्रो सोल्यूशन्स या कंपनीमार्फत भारती एंटरप्रायझेस, हैदराबाद यांना विक्री करणार होते. भारती एंटरप्रायझेस यांनी साखर खरेदी करण्यासाठी ऍडव्हान्स म्हणून नऊ लाख 94 हजार 500 रुपये एवढी रक्कम भवानगिरी शुगर एजन्सीचे नवनाथ नलवडे यांच्या कंपनीच्या खात्यात पाठवली. विजय चौगुले व नवनाथ नलवडे यांनी भोगावती कारखाना, कोल्हापूर येथून साखरेची गाडी भरून कर्नाटक येथे जाण्यासाठी निघालेली आहे, असे सांगून संपर्कासाठी चालक राजगुंड याचा मोबाईल क्रमांक दिला. 

सूर्यवंशी यांनी चालकास गाडी पोचली का, याबाबत फोन केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विजय चौगुले व नवनाथ नलवडे यांनी सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत दिशाभूल केली. 30 मेट्रिक टन साखर देण्याचा ठराव झाला असताना विजय चौगुले व नवनाथ नलवडे यांनी नऊ लाख 94 हजार 500 रुपये एवढी रक्कम ऍडव्हान्स देऊनही पूर्ण केला नाही. 15 जून रोजी सूर्यवंशी यांना नवनाथ नलवडे यांनी भारती एंटरप्रायझेस, हैदराबाद या कंपनीच्या नावाने चार लाख 76 हजार 500 रुपये व चार लाख 76 हजार रुपयांच्या रकमेचे आयसीआयसीआय बॅंकेचे दोन धनादेश दिले. परंतु दोन्ही धनादेश बाऊन्स झाले आहेत. फसवणूक केल्याप्रकरणी रविराज सूर्यवंशी यांनी विजय चौगुले, नवनाथ नलवडे व राजगुंडा यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT