cyber crime
cyber crime sakal
सोलापूर

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात! US डॉलरच्या आमिषातून महिलेची २२ लाखांची फसवणूक

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर काही दिवसांनी व्हॉट्‌सॲप कॉलवरून बोलणे वाढले. चॅटिंगमधून कॅप्टन मॅक्सवेल लुकास याने सोलापुरातील एका पदवीधर महिलेला ७० हजार यूएस डॉलरचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने त्या महिलेने तब्बल २१ लाख ८६ हजार ४४३ रुपये त्या व्यक्तीला पाठविले. पण, त्या महिलेला ना यूएस डॉलर ना स्वत:ची रक्कम परत मिळाली. याप्रकरणी त्या महिलेच्या फिर्यादीवरून कॅप्टन मॅक्सवेल लुकास, कल्याणी व राहुल कुमार यांच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला २० जून ते १९ जुलै या महिन्यात समोरील व्यक्तींनी ७० हजार यूएस डॉलरचे गिफ्ट देणार असल्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून महिलेने पहिल्यांदा त्या व्यक्तीला युनियन बॅंकेच्या खात्यावर सहा लाख ४० हजार रुपये पाठविले. त्यानंतर कोटक महिंद्रा बॅंकेच्या खात्यावर सहा लाख ९० हजार रुपये, पुन्हा एसबीआय बॅंकेच्या खात्यावर ९६ हजार, इंडियन बॅंकेच्या खात्यावर एक लाख रुपये आणि कॅनरा बॅंक खात्यात दोन लाख ५४ हजार रुपये पाठविले. प्रत्येकवेळी तुमचे गिफ्ट विमानतळावर पाठविले आहे, पण कस्टम ड्यूटीमुळे ते भारतात आणण्यास अडचणी येत असल्याचे सांगून समोरील व्यक्तीने त्या महिलेकडून पैसे उकळले. आपल्याकडील पैसे गेले तरी चालतील, पण ७० हजार डॉलर मिळतील म्हणून त्या महिलेने विश्वास ठेवून पैसे पाठविले. मात्र, आपल्याकडील पैसे संपल्याचे सांगितल्यानंतर त्या तिघांनी कॉल करायचे सोडून दिल्याची माहिती त्या महिलेने पोलिसांना दिली. फिर्यादी महिलेने आपले नाव सर्वांना समजू नये म्हणून पोलिसांकडे विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी निनावी फिर्याद घेत माहिती दिली.

साठवलेली रक्कम गेल्याने झाली पंचाईत

सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर कॅप्टन लुकास याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी ते व्हॉट्‌सॲपवर बोलू लागले. सावज जाळ्यात अडकल्याचा अंदाज आल्यावर त्याने महिलेला मोठ्या यूएस डॉलरचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून महिलेने स्वत:जवळील, मुलांच्या नावावरील ‘फिक्स डिपॉझिट’ची रक्कम आणि पुन्हा माहेरील व्यक्तींकडून काही रक्कम घेऊन त्या व्यक्तीला पाठविली. जवळचे सगळेच पैसे गेल्याने त्या महिलेची पंचाईत झाली आहे.

शेवटच्या टप्प्यातही मारला हात

मोठ्या रकमेचे आमिष दाखवून २० लाख ९० हजार रुपयाला फसविलेल्या महिलेची चिंता वाढली होती. त्यावेळी राहुल कुमार याने महिलेला कॉल केला आणि तुमचे पैसे परत हवे असल्यास ‘एनी डेस्क’ ॲप डाउनलोड करायला सांगितले. ॲप डाउनलोड केल्यावर ओटीपी विचारून घेतला आणि शेवटी महिलेच्या खात्यातील शिल्लक ९६ हजार ४४३ रुपयांची रक्कमही काढून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आता संशयित आरोपींचे लोकेशन पोलिसांना सापडत नसल्याची स्थिती आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT