सोमवारपासून पेनूर झेडपी गटात 'नागरिकांचा जनता दरबार'! Sakal
सोलापूर

सोमवारपासून पेनूर झेडपी गटात 'नागरिकांचा जनता दरबार'!

सोमवारपासून पेनूर झेडपी गटात 'नागरिकांचा जनता दरबार'!

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ तालुक्‍यातील दुसरा टप्पा सोमवारपासून (ता. 27) पेनूर जिल्हा परिषद गटात सुरू होत आहे.

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या संकल्पनेतून नागरिकांचा जनता दरबार (Janata Darbar) राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मोहोळ (Mohol) तालुक्‍यातील दुसरा टप्पा सोमवारपासून (ता. 27) पेनूर जिल्हा परिषद (Solapur ZP) गटात सुरू होत आहे. या गटातील 11 गावांमध्ये हा नागरिकांचा जनता दरबार राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. (From Monday Janata Darbar will be held in Penur ZP group)

सोमवारी सायंकाळी सहा वाजता आढेगाव, रात्री आठ वाजता पाटकूल, मंगळवारी (ता. 28) सायंकाळी सहा वाजता सौंदणे, रात्री आठ वाजता टाकळी सिकंदर येथे नागरिकांचा जनता दरबार भरणार आहे. गुरुवारी (ता. 30) सायंकाळी सहा वाजता वरकुटे, रात्री आठ वाजता शेजबाभुळगाव, शुक्रवारी (ता. 30) सायंकाळी सहा वाजता तांबोळे व रात्री आठ वाजता अंकोली येथे नागरिकांचा जनता दरबार होणार आहे. शनिवारी (ता. 1) सायंकाळी सहा वाजता पेनूर येथे तर रात्री आठ वाजता औंढी येथे नागरिकांचा जनता दरबार आहे. रविवारी (ता. 2) सायंकाळी सहा वाजता नजीक पिंपरी येथे नागरीकांचा जनता दरबार होणार आहे.

कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, अक्कलकोट (Akkalkot), दक्षिण सोलापूर (South Solapur) या तालुक्‍यात नागरिकांचा जनता दरबार झाल्यानंतर मोहोळ तालुक्‍यात हे अभियान राबविण्यात येत आहे. मोहोळ तालुक्‍यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविले जाणार आहे, त्याची सुरुवात नरखेड जिल्हा परिषद गटापासून झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात मोहोळ तालुक्‍यातील पेनूर जिल्हा परिषद गटात नागरिकांचा जनता दरबार भरणार आहे. या गटातील नागरिकांनी जनता दरबाराचा लाभ घ्यावा. तालुका स्तरावरील, जिल्हा स्तरावरील व राज्य स्तरावरील प्रलंबित प्रश्‍न या जनता दरबाराच्या माध्यमातून सोडविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT