Lockdown
Lockdown Esakal
सोलापूर

उद्यापासून किराणा, मंडई सुरू मात्र विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही !

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनची (Lockdown) मुदत उद्या (शनिवार ता. 15) सकाळी पूर्ण होत आहे. उद्यापासून किराणा, भाजीपाला, फळ विक्री यासह अत्यावश्‍यक सेवेची दुकाने सुरू होतील. रस्त्यावर विनाकारण गर्दी फिरणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. (From tomorrow, groceries and markets will start, but action will be taken against those who walk without any reason)

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हा प्रशासनासोबत बैठक झाल्यानंतर सातरस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीच्या कामासाठी आडकाठी आणली जाणार नाही. शेतीच्या कामासाठी परवानगी दिली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक असलेली सर्व कामे पूर्ण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाउनची मुदत उद्या संपत असली तरीही महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला लॉकडाउन उद्यापासून सुरू होत आहे. अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरू करण्याची परवानगी देत असताना कडक निर्बंध मात्र लावले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पालकमंत्री भरणे म्हणाले, इंदापूर जसे मला प्रिय आहे तसेच सोलापूरही मला प्रिय आहे. त्यामुळे मी सोलापूरवर कुठलाही अन्याय करणार नाही. कोरोना मुक्तीच्या लढ्यात सोलापूरला जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी तुमचा पालकमंत्री खंबीर आहे. इंदापूरला दिल्या जाणाऱ्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न संपला आहे. इंदापूरकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे हे पाणी मिळताना सोलापूरचे एक थेंबही पाणी आपण घेणार नसल्याचे वारंवार सांगत आहोत. याबाबतचे तांत्रिक स्पष्टीकरण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे उजनीच्या पाच टीएमसी पाण्याचा विषय माझ्या दृष्टीने संपला असल्याची स्पष्टोक्ती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.

पीपीई किट घाला, रुग्णांशी संवाद करा

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आंदोलनाचा समाचार घेत पालकमंत्री भरणे म्हणाले, भाजपच्या किती नेत्यांनी कोव्हिड सेंटरला भेटी दिल्या, रुग्णांशी संवाद साधला? सर्वसामान्यांच्या रोजीरोटीला हातभार लावण्यासाठी योगदान दिले? याचे आत्मचिंतन त्यांनी करावे. दुसऱ्यावर आरोप करून आणि कोरोनाच्या बिकट स्थितीत राजकारण करून हा प्रश्‍न सुटणार आहे का? तुम्ही जनतेत जा, पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद साधा, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT