g20 summit live update agriculture success story of Jagannath Magar of Nimgaon presented in G20 conference Sakal
सोलापूर

G-20 Summit 2023 : जी 20 परिषदेत निमगावच्या जगन्नाथ मगर यांची सादर होणार शेती यशकथा

शेती हा केवळ उत्पन्न मिळवणारा उद्योग नाही, तर समृद्धी देणारा व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शेती हा केवळ उत्पन्न मिळवणारा उद्योग नाही, तर समृद्धी देणारा व्यवसाय आहे. या जाणीवेने शेतीमध्ये सेंद्रिय उत्पादने, विषमुक्त शेती, पशुपालन, रेशीम कोश निर्मितीसारखे अनेक प्रयोग करणारे निमगाव (ता. माळशिरस) येथील जगन्नाथ मगर यांची यशकथा जी-२० शिखर परिषदेत सादर केली जाणार आहे.

जगन्नाथ मगर यांची निमगावात १५ एकर शेती आहे. त्यांनी शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मूलभूत प्रयत्न केले. सुरवातीपासून त्यांनी शेतात रासायनिक खते व कीटकनाशक बंद केले. त्यानंतर गोपालन करत गाईचे शेण व गोमुत्राचा वापर करत जमिनीच्या सुपीकतेसाठी अनेक वर्ष केलेल्या प्रयत्नाने जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला.

जैविक घटकांमुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे पाणी वापरात लक्षणीय काटकसर करता आली. त्यांनी गाईसोबत मेंढ्या, शेळ्या व म्हशीचे पालन केले. त्यातून त्यांनी वर्षभर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून घेतले.

तुतीची लागवड करून रेशीम कोशाची निर्मिती केली. ही लागवड केल्यानंतर त्यांना केवळ १५ च्या ऐवजी १३ फिडींगमध्ये कोश मिळू लागले. तसेच कोशाच्या धाग्याची गुणवत्ता वाढल्याने कोशालाही दर वाढून मिळाले.

उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना त्यांनी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले. सेंद्रिय शेती करताना केवळ ती उत्पादन गुणवत्ता बदलणारी नसावी तर उत्पादनाचे विक्रम नोंदविणारी असावी हे त्यांनी विविध पिकांच्या प्रयोगातून सिद्ध केले. त्यांनी स्वतःचे घर बांधले तर त्याला शेणापासून निर्मित प्लास्टर केले. त्यामुळे घराच्या तापमानातील फरक प्रत्येकाला अनुभवता येतो.

यापूर्वी आयसीएआरकडून (इंडियन कॉउन्सील ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च) त्यांना शेतीविषयक विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय परिषदेत त्यांना निमंत्रित केले होते. त्यानंतर केंद्राच्या वतीने जी-२० शिखर परिषदेत विदेशातील पाहुण्यांना भारतीय नैसर्गिक शेतीबद्दलची त्यांची यशकथा सादर केली जाणार आहे.

लक्षवेधी...

- १५ एकर विषमुक्त शेती

- गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या अशा ४० जनावरांचे पालन

- शेण, गोमूत्र व लेंड्याचा वापर जमिनीच्या सुपीकतेसाठी

- रेशीम शेतीतून विक्रमी उत्पन्न

- एक एकरात ३५ टन कलिंगडाचे उत्पादन

- जलपुनर्भरणद्वारे भूजल पातळीचे संतुलन

- जैविक घटकांमुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवणे शक्य

मागील काही वर्षापासून विषमुक्त शेतीचा प्रयोग करत असताना रासायनिक खताच्या खर्चात झालेली बचत हा नफा गृहीत धरला पाहिजे. तसेच वाढीव भाव देखील हमखास मिळतो. शेती हे काम म्हणून नव्हे तर छंद समजून केले तर अनेक प्रयोग यशस्वी करता येतात.

- जगन्नाथ मगर, निमगाव (म.), ता. माळशिरस, जि. सोलापूर

जगन्नाथ मगर हे तेजपूर (आसाम) विद्यापीठात झालेल्या सेंद्रिय उत्पादकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांची निवड इंडियन नॉलेज सिस्टमअंतर्गत आम्ही निवड केली. त्यामध्ये जगन्नाथ मगर यांच्या शेतीप्रयोगाची चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत जी-२० च्या संबंधित चमूकडे पाठवली गेली आहे.

- विजयकुमार चौरासिया, प्रॉडक्शन मॅनेजर, आयकेएस, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT