Gaibi Peer ideal tradition of Hindu Muslim unity  sakal
सोलापूर

सोलापूर : गैबी पीर ऊरूसातील हिंदू आणि मुस्लीम यांच्या ऐक्याची आदर्श परंपरा

हिंदू आणि मुस्लीम यांच्या ऐक्यातून गेले अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मंगळवेढयातील गैबी पीर ऊरूसातील सर्वधर्मसमभावाची परंपरा देशात आदर्श ठरणारी आहे.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : हिंदू आणि मुस्लीम यांच्या ऐक्यातून गेले अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मंगळवेढयातील गैबी पीर ऊरूसातील सर्वधर्मसमभावाची परंपरा देशात आदर्श ठरणारी आहे. 21 व्या शतकात तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी धर्मांध राजकारण करणाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशा परिस्थितीत हिंदू उत्सवाचा प्रमुख मुस्लिम व्यक्ती आणि मुस्लिम उत्सवाचा प्रमुख हिंदू व्यक्ती अशी परंपरा देशात फक्त मंगळवेढ्यात पाहायला मिळत आहे.

मंगळवेढ्याचे उदाहरण आहे इतरांसाठी आदर्श ठरणारे आहे. 52 मानकय्राच्या सोबतीने साजरा होणारा शहरातील गैबी पीर ऊरूस हा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अनोखे प्रतीक असून गेल्या अनेक वर्षापासून दोन धर्मांच्या एकोप्याने हा उरूस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.कोरोनामुळे गेली दोन वर्षे शहरातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमावर मर्यादा आल्या होत्या. यंदा जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत शासनाने सवलती दिल्यामुळे तालुक्यातील सांस्कृतिक रेलचेल पुन्हा पूर्ववत झाली व दोन वर्षे घरात अडकून पडलेल्या नागरिक या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर पडू लागले.ऊरुस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गेले दोन वर्ष मरगळलेल्या मंगळवेढेकरासाठी मेजवानी दिली उरुसाच्या पहिल्या दिवशी कळसाची भव्य मिरवणूक बोराळ नाका येथून धार्मिक वातावरणात पार पडली या मिरवणुकीमध्ये सांगली,कराड,येथील नामवंत बँड, असल्यामुळे शहर व ग्रामीण भागा बरोबर शेजारील तालुक्यात कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होती दर्शनासाठी रांग लावल्यामुळे अनेकांना दर्शन घेण्यासाठी विलंब होत होता पहाटेच्या दरम्यान दर्ग्यावर कळसारोहण करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी हबीब अजमेरी यांचा कव्वाली चा जंगी मुकाबला झाला. उरूसाच्या निमित्ताने करण्यात आलेली विद्युत रोषणाई ही भाविकांना आकर्षित करणारी ठरत आहे. तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे स्पर्धा घेण्यात आल्या सायंकाळी नामांकित कवीचे कवी संमेलनामध्ये राजकीय सामाजिक ऐक्य बरोबर मंगळवेढ्याचा उरुस हा देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असून जातीय राजकारण करणाऱ्यांसाठी आदर्श घ्यावे असे मंगळवेढा एक उत्तम उदाहरण आहे अशा पद्धतीने त्यांनी जातीवादावर कवि अनंत राऊत यांनी प्रहार केला तर कौटुंबिक वादावर देखील कवींनी त्यांच्या शाब्दिक प्रहाराने प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला. तालीब सोलापुरी यांनी सासू-सुनेच्या कुरघोडी वर भाष्य केले वात्रटिकाकार शिवाजी सातपुते यांनी माणसाच्या वागण्यात झालेल्या बदलाबरोबर राजकीय घडामोडीवर भाष्य केले कवी इंद्रजित घुले यांनी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. आज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने ऊरूसाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT