Shri Ganseh 
सोलापूर

विघ्न कोरोनाचे ! "या' शहरातील 900 तर ग्रामीणमधील "इतक्‍या' मंडळांनी केली नाही "श्रीं'ची प्रतिष्ठापना 

तात्या लांडगे

सोलापूर : गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न कायम असून शहरातील तब्बल 900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी "श्रीं'ची प्रतिष्ठापना केली नसल्याची माहिती पोलिस आयुक्‍तालयातील विशेष शाखेकडून देण्यात आली. जिल्ह्यातील 229 गावांमध्ये "एक गाव - एक गणपती'ची प्रतिष्ठापना झाली, तर तब्बल 702 गावांमध्ये यंदा सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कोणत्याही गणेशोत्सव मंडळाला मंडप, गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, विर्सजन मिरवणुकीस पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पुढच्या वर्षी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील मंद्रूप, बार्शी तालुका, माढा, पांगरी, पंढरपूर तालुका, सांगोला या पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापना केलेली नाही. जिल्ह्यातील एकूण 615 गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. 

दुसरीकडे 229 गावांमध्ये "एक गाव - एक गणपती' बसविण्यात आला आहे. तर मोहोळ तालुक्‍यातील 50 गावे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 22 गावे, कामती 12, अक्‍कलकोट उत्तर 16, अक्‍कलकोट दक्षिण 25, वळसंग आठ, बार्शी तालुका 43, माढा 33, वैराग 34, पांगरी 26, करमाळा 91, टेंभुर्णी 10, कुर्डुवाडी 11, पंढरपूर तालुका 52, पंढरपूर ग्रामीण 19, करकंब 24, मंगळवेढा 80, सांगोला 103, माळशिरस पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाच गावांमध्ये यंदा एकाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही. 

याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, शहरातील नागरिकांनी पाळलेली स्वयंशिस्त, नगरसेवकांचा पुढाकार आणि महापालिका प्रशासन, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे संसर्ग आटोक्‍यात येत असल्याचे समाधान आहे. गणेशोत्सव मंडळे यंदा जनजागृतीवर भर देत असून त्याचा निश्‍चितपणे शहरवासीयांसाठी चांगला फायदा होईल. 

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले, ग्रामीण भागात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनीही पोलिस प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे. गणेशोत्सव हा दरवर्षी मोठा असतो, परंतु यंदा अनेक गावांमधील गणेशोत्सव मंडळांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे. 
संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT