PPE Kit 
सोलापूर

कोरोनामुळे चतुर्भुज गारमेंट उद्योगाला कोरोनानेच दाखवल्या नव्या वाटा, नव्या दिशा ! मात्र... 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आज शहरातील महिला विडी कामगारांना पर्यायी रोजगार देणारा व्यवसाय म्हणून गारमेंट उद्योगाकडे पाहिले जात आहे. फॅन्सी गारमेंटशिवाय आज येथील गारमेंट व्यवसायाने जगात सोलापूरचे नाव "युनिफॉर्म हब' म्हणून केले आहे. स्कूल युनिफॉर्मसह कॉर्पोरेट, हॉस्पिटल आदी अनेक क्षेत्रांसाठी लागणाऱ्या युनिफॉर्मची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र... "कोविड-19'मुळे 2020 हे वर्ष गारमेंट उद्योगासाठी खूप मोठे नुकसानकारक ठरले आहे. स्कूल युनिफॉर्मची मागणी 75 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी झाली. अजूनही शाळा सुरू न झाल्याने उर्वरित मागणीवरही परिणाम होण्याची भीती गारमेंट व्यवसायाला लागली आहे. मात्र... कोरोनामुळे येथील गारमेंट उद्योगाला नव्या वाटा व नव्या दिशा दृष्टिक्षेपात पडल्या आहेत, ज्यामुळे आज गारमेंट उद्योजकांमध्ये जरी निराशाजनक वातावरण असले, तरी भविष्यातील अभूतपूर्व संधींमुळे निराशाचे रूपांतर उल्हासात होण्यास वेळ लागणार नाही... 

काळानुसार बदल स्वीकारणाऱ्या गारमेंट उद्योगाचा इतिहास 
स्वातंत्र्योत्तर काळापासून बंडी, टोप्या, झबले शिवून सोलापुरातील मंगळवार बाजार, बुधवार बाजार व तालुक्‍यांतील आठवडी बाजार तसेच कर्नाटकातील बाजारपेठांमध्ये जाऊन विक्री करण्याचा व्यवसाय येथील शिंपी समाजाचा... घरोघरी जुन्या सिंगल पाटा मशिनवर घरातील सदस्य शिलाईची कामे करत. 1970 मध्ये श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाची स्थापना झाली. 1980 नंतर रेडिमेड उत्पादनांमध्ये बदल होऊन शाळेचे गणवेश, फॅन्सी ड्रेस अशा विविध प्रकारच्या रेडिमेड कपड्यांची उत्पादने सुरू झाली. सोलापूरचे व्यापारी, मुंबई, पुणे येथील वस्त्र प्रदर्शनांमध्ये भाग घेऊ लागले. ग्राहकांची मागणी व नवनवीन उत्पादनांचा अंदाज घेत सोलापुरातही त्यानुसार नव्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात सुरवात झाली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत गेली. 

इंटरनॅशनल युनिफॉर्म एक्‍झिबिशनमुळे मिळाली कलाटणी 
आज गारमेंट उद्योगात फॅन्सी कपड्यांचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. युनिफॉर्म उत्पादनांमध्ये हातखंडा मिळवलेल्या युनिफॉर्म उत्पादकांनी केंद्र व राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने गेल्या चार वर्षांपासून (2015 ते 2019) आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे आयोजन करून सोलापूर युनिफॉर्मचे नाव जगभरात केले. असे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवणारे जगातील पहिले गारमेंट असोसिएशन म्हणूनही सोलापूरचे नाव झाले. परिणामी, देशातील अनेक राज्यांसह विदेशातूनही युनिफॉर्मला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. आज सोलापूर गारमेंट असोसिएशनच्या 325 हून अधिक सदस्य असलेल्या कारखानदारांव्यतिरिक्त शहरातील छोट्या-मोठ्या कारखान्यांत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत युनिफॉर्मची उत्पादने होतात तसेच बारा महिने फॅन्सी कपड्यांची उत्पादने होत असल्याने, यंत्रमाग व विडी उद्योगानंतर वेगाने वाढणारा व मोठ्या प्रमाणात रोजगारा देणारा उद्योग म्हणून गारमेंट उद्योगाकडे पाहिले जात आहे. 

कोरोनामुळे गमावले व कोरोनामुळेच नव्या संधी मिळवणार 
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी सुरू झालेल्या देशभरातील लॉकडाउनमुळे शहरातील अनेक उद्योगांमध्ये मंदी आली आहे. त्यात गारमेंट उद्योगही सुटला नाही. मोठे ऑर्डर्स रद्द झाल्याने कारखानदारांसह कामगारही बेरोजगार झाले आहेत. अनेक उद्योजकांपुढे "आता पुढे कसे' असा प्रश्‍न सतावत आहे. मात्र गारमेंट उद्योगाला या मंदीतूनही नव्या वाटा व नव्या दिशा मिळत असून, आता युनिफॉर्म व्यवसायाव्यतिरिक्त कोरोनामुळे इतर उत्पादनेही निर्मिती करण्याची संधी निर्माण झाली आहे. 

यापुढे कोरोनासोबत जगताना अत्यावश्‍यक बाबी 
आता यापुढे जगभरातील नागरिकांना कोरोनासोबत जीवन जगावे लागणार आहे. याचा विचार करता प्रत्येकाने आपल्या व घरच्या सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. आज प्रत्येकाकडे रुमाल असतो त्याप्रमाणे दोन-दोन मास्कची गरज भासणार आहे. पुढे मास्कमध्येही नवनवीन फॅशनेबल मास्कचीही मागणी वाढणार आहे. गारमेंट उद्योजकांनी लॉकडाउनच्या काळात कॉटन मास्कची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आहे, ज्याला कर्नाटक व इतर राज्यांतूनही मागणी आहे. यापुढेही महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कची निर्मिती होणार आहे. यात छोट्या गारमेंट उत्पादकासह मोठ्या कारखान्यांमध्येही एक युनिट मास्कची निर्मिती करण्यासाठी तयार ठेवावी लागणार आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना अत्यावश्‍यक असणाऱ्या पीपीई किटची निर्मितीही गारमेंट उत्पादकांनी सुरू केली आहे. गारमेंट असोसिएशनने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) असोसिएशनच्या गाइडलाइननुसार तयार केलेल्या डिस्पोजेबल व नॉन डिस्पोजेबल पीपीई किटला विविध राज्यांतून मागणी आहे. यापुढेही प्रत्येक दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर, परिचारिका व सेवकांना पीपीई किटशिवाय सेवा देणे शक्‍य नाही. त्यामुळे पीपीई किटसह हेडगिअर, थ्री प्लाय फेस मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज, बायो हझर्ड बॅग्ज, शू कव्हर अशी विविध उत्पादने घेता येणार आहेत. याचबरोबर ऑल कव्हर सूट जो 100 टक्के पॉलिस्टर 60 जीएसएम वॉटर प्रूफ टफेटा फॅब्रिकपासून बनलेला असतो. आयसीएमआर अप्रुव्हल नसला तरी हा सूट पोलिस, अंगणवाडी सेवक, हॉस्पिटलमध्ये वावरताना रुग्णांच्या नातेवाइकांना व आरोग्यसेवकासांठी आवश्‍यक आहे, याच्या उत्पादनांनाही भविष्यात मोठी मागणी असणार आहे. 

याशिवाय सलून व्यावसायिकांना यापुढे आपल्या ग्राहकांकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक सलून यापुढे डिस्पोजल अँड रियुजेबल सूटचा वापर करूनच आपला व्यवसाय करू शकेल. जो असा किट वापरणार नाही, त्या दुकानात ग्राहकही पाय ठेवण्यास धजावणार नाही. अशाच प्रकारे ट्रॅव्हलिंग किट रियुजेबल अँड डिस्पोजेबल, रेस्टॉरंटमधील शेफ, वेटर व सेवकांसाठी रियुजेबल अँड डिस्पोजेबल किट, बॅंकिंग सेक्‍टर, लॉजिंग, हॉस्पिटल युनिफॉर्म्स, इंडस्ट्रिअल रियुजेबल अँड डिस्पोजेबल सूट अशा अनेक क्षेत्रांत सुरक्षा साधनांची अत्यावश्‍यकता भासणार आहे, ज्याची गरज गारमेंट उद्योग पूर्ण करू शकते. 

मात्र प्रशासनाने सहकार्य करण्याची आवश्‍यकता 
याबाबत गारमेंट असोसिएशनचे संचालक अमित जैन म्हणाले, कोरोनामुळे गारमेंट व्यवसायाचे खूप मोठे नुकसान झाले तरी कोरोनामुळेच गारमेंट व्यवसायात खूप मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत जेवढे लॉकडाउन झाले त्याला उद्योजकांनी पूर्णत: सहकार्य केले आहे. आता यापुढे लॉकडाउन न करता उद्योगवाढीच्या दिशेने आता वाटचाल करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेली गारमेंट उत्पादने सोलापुरात तयार होत आहेत, त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करायची हीच वेळ आहे. त्यासाठी त्या-त्या देशांतील आपल्या राजदूतांमार्फत आपल्या देशातील उत्पादनांची माहिती प्रसारित होणे आवश्‍यक आहे; अन्यथा इतर देश वर्चस्व निर्माण करण्यास तयारच आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT