gauri pujan sakal
सोलापूर

गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी

लाडक्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौराई चे स्वागत करताना महिलावर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

राजकुमार घाडगे

पंढरपूर (सोलापूर) : गौराई आली सोन्याच्या पावलांनी.. गौराई आली माणिक मोत्याचा पावलांनी.. असे म्हणत रविवारी (ता.12) लाडक्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौराई चे स्वागत करताना महिलावर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

गणेशोत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे गौरी आगमन. गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ दोन दिवसांनी गौरीचं आगमन होतं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं. ग्रामीण भागात गौरी पूजनाला 'महालक्ष्मी पूजन'असेही म्हणतात. यंदा सगळीकडे कोरोनाचे संकट असले तरी महिलांनी गौरी सणाच्या उत्साहात कुठेही कमतरता ठेवली नाही.

नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा हार, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीचे पूजन केले. घराघरात गौराई समोर विविध वस्तू, फळे, मिठाई, आकर्षक रोषणाईची सजावट केल्याचे दिसून आले. गौरी-गणपतीच्या निमित्ताने बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले. चौफाळा येथील फुलांचे विक्रेते दीपक राऊत म्हणाले, फुलबाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली. शेवंतीची फुले मात्र इथे मिळत नसल्याने आम्ही खास बेंगलुरू येथून मागवली आहेत. सणामुळे फुलहारांच्या दरात वाढ झाली असून पिक्चर एरवी पन्नास रुपयाला मिळणारा फुलांचा मोठा हार शंभर रुपये दराने विकला जात आहे.

गौराईला भाजी-भाकरी सह भोजनाचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. त्याकरिता भाजीबाजारात महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. दरवर्षीपेक्षा यंदा मात्र भाज्यांचे दर उतरल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. गौराईला नैवेद्य दाखवण्यासाठी केळीच्या पानाला मोठी मागणी होती. केळीचे एक पान दहा रुपयाला विकले गेले. गौराईची प्रतिष्ठापना करताना विविध पद्धती दिसून आल्या. काही घरात गौराई पाटावर विराजमान होत्या तर काही लोखंडी सांगाड्यावर सजावट करून केल्या होत्या. पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव व गौराईच्या सणामुळे घराघरात पुढील काही दिवस भक्तिमय वातावरण असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT