nechar conjervetion srka;.jpeg 
सोलापूर

महिलांच्या हातून "घोणस' केला मुक्त : नेचर कॉझरर्वेशन सर्कलचे महिलादिनी अभिनव कार्य 

अरविंद मोटे

सोलापूर : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सर्व क्षेत्रात महिलाही धडाडीने पुढे येत आहेत. अनेक महिलाही सर्पमित्र झालेल्या आहेत. तरीही सामान्यत: महिलांमध्ये भीती अधिक असते. ती कमी व्हावी, महिलाही धाडसी व्हाव्यात, यासाठी महिलादिनी नेचर कॉझरर्वेशन सर्कलचे भरत छेडा यांनी महिलांच्या हातून घोणस रेस्क्‍यू केला. 

विजापूर रोडवरील रेणुका नगर परिसरात सोमवारी (8 मार्च) रात्री 9:30 एका घरात घोणस हा विषारी साप आढळला. दूरवर राहणाऱ्या एकट्या-दुकाट्या घरांना अशा प्रसंगाला नेहमीच सामोरे जावे लागते व अशा ठिकाणी सर्पमित्र वेळेत पोहचणेही अवघड होते, यासाठी नेचर कॉझरर्वेशन सर्कलचे भरत छेडा यांनी सापाला रेस्क्‍यू करण्याची साधी, सोपी व सुरक्षित पद्धत महिलांनाही शिकवली. महिलादिनी महिलांही धाडसी व्हावे व संकटाला सामोरे जावे, यासाठी साप पकडण्याची पद्धतही शिकवली. एका पीव्हीसी पाईपचे एक तोंड कापडाने बंद करून पाईपचे दुसरे तोंड साप असलेल्या जागी ठेवले. बिळासारख्या पाईपमध्ये अलगद साप आत गेला तेव्हा तो महिलांनाच उचलून दूर व सोडण्यास सांगितले. अत्यंत सोप्यापद्धतीने विषारी सापदेखील आपण सुरक्षित ठिकाणी सोडू शकतो. साप निघाला म्हणून घाबरून न जाता अथवा सापाला न मारता त्याला त्याच्या अधिवासात सहज सोडता येते, हे त्यांनी तेथील उपस्थित महिलांना पटवून दिले. यावेळी अनेक महिला धाडसाने पुढे आल्या व सापाला रस्क्‍यू करण्याची कला शिकवण्यात आली. 

नेचर कॉझरर्वेशन सर्कलचे भरत छेडा यांनी सांगितले की, अनेक घरे दूरवर शेतात असतात. अशा घरांमध्ये साप येण्याच्या घटना सतत घडतात. अशा घरांपर्यंत सर्पमित्र पोहचणे कठीण असते. एक पीव्हीसी पाईपद्वारे सापला दूर करता येते. महिलांसह सर्वांनी ही पद्धत लक्षात घ्यावी. घरात साप आला म्हणून लगेच त्याला मारण्याचे कारण नाही. अनेक साप बिनविषारी असतात. अगदी विषारी साप देखील काळजीपूर्वकपणे कोणही पकडू शकतो. साप दिसला लगेच मारू नका. त्याला पाईपच्या माध्यमातून पकडा दूरवर नैसर्गिक अधिवासात सोडा. यामुळे पर्यावरणाची साखळी वाचेल व निसर्गाचा समातोल बिघडणार नाही. 


संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT