अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली
अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली Sakal
सोलापूर

अरण्यऋषींकडून ‘निसर्ग शब्दां’ची देण

अरविंद मोटे

सोलापूर : मराठी भाषेचे शब्दभांडार अधिक समृद्ध करत सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी निसर्ग शब्दांची देणगी दिली आहे. प्राणीकोश, पक्षीकोश तसेच इतर साहित्य निर्मिती करत असताना इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द तसेच आदिवासी बोलीत असलेले मात्र प्रमाणभाषेत नसलेले अनेक शब्द चितमपल्ली यांनी मराठीत रूढ केले आहेत.

‘जॉइंट ट्री’ या इंग्रजी शब्दाला मराठीत ‘देववृक्ष’ तर जॉइंट स्क्विरल’ला ‘देवखार’ असे अनेक शब्द तयार केले आहे. बांबूची बेटे हरणाला ठराविक उंचीपर्यंत खाता येतात. त्या उंचीला इंग्रजीत ‘डीअर लाईन’ असे म्हणतात. या शब्दाला मराठीत ‘हरिणरेषा’ असा शब्द तयार करण्यात आला आहे. गंधाकरीता मराठी भाषेत शब्द नाहीत. ‘गुलाबा’सारखा गंध, ‘मोगऱ्या’सारखा गंध असेच आपण म्हणतो. मात्र आदिवासी भाषेत या गंधांना शब्द आहेत. वाघ, अस्वल आदी प्राणी जिथे राहतात. त्याठिकाणी येणाऱ्या गंधाकरिता आदिवासी भाषेत शब्द आहेत. मोहाच्या फुलाला ‘बोयांन बोयांन’ तर, वाघ जेथे राहतो तेथे येणाऱ्या गंधास ‘बोथऱ्यांन,बोथऱ्यांन’, अस्वल जेथे राहते तेथे ‘मिरींगता मिरींगता’ असे शब्द आदिवासी बोलीत वापरले जाते होते. ते शब्द चितमपल्ली मराठीत आणले आहेत.

असाही ‘शब्दतरंग’

डॉ. उमेश करंबळेकर यांच्या ‘शब्दतरंग’ या पुस्तकात चितमपल्ली यांच्या शब्दांवर विस्तृत लेखन आहे. मारुती चितमपल्ली हे नवेगावला असताना तेथील माधवराव पाटील यांनी आदिवासी भाषेतील पाचशे पशुपक्ष्यांची नावे सांगितली. ते शब्द मारुती चितमपल्ली यांनी मराठी भाषेत कोश वाङ्‌मयात आणली आहेत.

संज्ञांचे मराठी नामकरण

मारुती चितमपल्लींनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत ‘रूकरी’ असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी ‘काकागार’ हा शब्द योजला. तसेच ‘हेरॉनरी’ (बगळे, ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत)ला ‘सारंगागार’ असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. ‘रूस्टिंग प्लेस’साठी ‘रातनिवारा’ हा शब्द वापरण्यात आला आहे. टणटणी (घाणेरी)चे ‘रायमुनिआ’ तर ‘बहाव्याचे ‘अमलताश’ हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहीत झाले.

अनेक शब्द आदिवासी बोलीत आहेत मात्र मराठीत नाहीत. ते मी मराठीत आणले. इंग्रजी भाषेच्या भाषांतरात अप्रिय वाटणाऱ्या शब्दांना मराठी प्रतिशब्द तयार केले. माझ्या डायरींमधून अनेक शब्दांची नोंद केली आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांनी माझ्या दहा वर्षांतील डायरींमधून अनेक नोंदी निदर्शनास आणून दिल्या आहेत. डॉ. उमेश करंबळेकर यांच्या पुस्तकातही या नोंदी आहेत.

- मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ साहित्यिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT