Girl Student sakal
सोलापूर

सोलापुरात शाळा-कॉलेजात ‘ती’ असुरक्षित! शाळा-महाविद्यालयांबाहेर २४०० रोडरोमियोंवर ‘या’ कलमाअंतर्गत कारवाई; मुलींनी ‘हा’ क्रमांक सेव्ह करून ठेवावा, लगेच मिळेल मदत

सोलापूर शहरातील बहुतेक शाळा- महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. शहर पोलिसांकडील दामिनी पथकांच्या अपुऱ्या संख्येमुळे ‘ती’ची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. गतवर्षी १२ महिन्यात ५८४ जणांवर कारवाई झाली होती. यंदा साडेसहा महिन्यातच तब्बल २४७९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानंतरही सोलापूर शहरातील बहुतेक शाळा- महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. शहर पोलिसांकडील दामिनी पथकांच्या अपुऱ्या संख्येमुळे ‘ती’ची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. गतवर्षी १२ महिन्यात ५८४ जणांवर कारवाई झाली होती. यंदा साडेसहा महिन्यातच तब्बल २४७९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात ८१ शाळा-महाविद्यालयांनी मुलींना रोडरोमिओंचा त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. मुलींसमोर स्टंट करण्याच्या नादात तरुणाच्या कारने बस स्टॉपवर थांबलेल्या ४ मुलींना चिरडल्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ताज्या घटनेने ‘ती’च्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सोलापूर शहरातील विभाग-एकच्या अंतर्गत जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी व फौजदार चावडी अशी चार पोलिस ठाणी आहेत. तर विभाग-दोनअंतर्गत सदर बझार, विजापूर नाका आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्याचा परिसर येतो. दोन्ही विभागासाठी प्रत्येकी एक दामिनी पथक आहे. प्रत्येक पथकात केवळ सहा महिला अंमलदार आहेत. सोलापूर शहराच्या हद्दीत ८० पेक्षा जास्त महाविद्यालये आणि सुमारे १२० कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

शहरातील बागा, बस थांबे, खेळाची मैदाने, शाळा-महाविद्यालये व निर्मनुष्य रस्ते, अशा ठिकाणी दामिनी पथकाच्या भेटी असतात, पण अपुऱ्या संख्येमुळे त्यांना दररोज त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लक्ष देता येत नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील कॅन्टिनवर थांबणारे टवाळखोर मुलींना त्रास देतात, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दामिनी पथकाने अशा ठिकाणांवर भेटी वाढविल्याने कारवाई झालेल्यांची संख्याही वाढली आहे.

टवाळखोरांवर नियमित कारवाई

शहरातील शाळा, महाविद्यालयांचा परिसर, मुलींच्या ये-जा करण्याचा रस्ता, बस थांबे, बगिचे, खेळाची मैदाने अशा ठिकाणी दामिनी पथकाच्या दररोज भेटी असतात. शाळा-महाविद्यालये भरताना आणि सुटताना देखील त्यांची गस्त असते. त्यावेळी विनाकारण थांबलेल्या, टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.

- धनंजय शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा कक्ष, सोलापूर शहर

‘या’ क्रमांकावर कॉल करा...

कोणी छेड काढत असेल किंवा दररोज शाळेत येताना त्रास देत असेल त्यावेळी ‘डायल ११२’वर संपर्क करावा. अवघ्या पाच ते आठ मिनिटात पोलिस त्याठिकाणी येऊन संबंधितांवर कारवाई करतील.

एका चुकीमुळे आयुष्य होईल बरबाद

शाळा-महाविद्यालयास येताना किंवा जाताना वाटेत मुलींची छेड काढली जाते. त्यातून अनेकांना शाळा सोडून द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मुली-महिलांची छेड काढणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ११० व ११७ नुसार कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, शांतता भंग किंवा इतर गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर कलम ११० नुसार आणि कलम ११७ नुसार अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना मदत करणे किंवा प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाई होते. मित्राच्या नादी लागून असे गैरकृत्य करून गुन्हा दाखल झाल्यास पुढे ना नोकरी ना पासपोर्ट मिळतो.

पोलिस ठाणेनिहाय कारवाई (जानेवारी ते जूनपर्यंत)

  • पोलिस ठाणे एकूण कारवाया

  • सदर बझार ६७८

  • जोडभावी पेठ ४२१

  • फौजदार चावडी ३४८

  • विजापूर नाका ३०५

  • एमआयडीसी २३५

  • जेलरोड १०६

  • सलगर वस्ती ०८८

  • एकूण २,१८१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT