सोलापूर

ग्लोबल टिचर डिसले गुरुजी बनले ‘डॉक्‍टर’

ग्वाल्हेर येथील आयटीएम विद्यापीठाने प्रदान केली मानद पदवी

सकाळ वृत्तसेवा

करकंब : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील आयटीएम विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यामुळे डिसले गुरुजी आता डॉक्‍टर बनले असून प्राथमिक शिक्षण क्षेत्राचा हा बहुमान समजला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिसले गुरुजींनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवून जगाच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यानंतरही डिसले गुरुजींनी अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये भाग घेत शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. एवढेच नाही तर जागतिक बॅंकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ’ग्लोबल कोच’ या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

विशेष म्हणजे जगभरातील निवड झालेल्या केवळ बारा शिक्षकांमध्ये त्यांचा समावेश आहे. जागतिक बॅंकेचा हा उपक्रम २०२१ ते २०२४ या कालावधीत कार्यान्वित राहणार आहे. डिसले गुरुजींच्या अशाच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना ग्वाल्हेर येथील आयटीएम विद्यापीठाने मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, उच्च शिक्षणमंत्री मोहन यादव, कुलुगुरु रुचिसिंग चौहान यांच्या हस्ते मानद डॉक्‍टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, महिला क्रिकेटपटू मिताली राज, अभिनेत्री शर्मिला टागोर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांनादेखील मानद डॉक्‍टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT