gold market 22 24 carat price marriage season investment Sakal
सोलापूर

Gold : दर वाढलेल्या सोन्याला लग्नसराईचा हात; नजीकच्या भविष्यातील दरवाढीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

सोन्याच्या बाजारात भाववाढीतही लग्नसराईमुळे ग्राहक स्थिर असून पुढील भाववाढीचा फायदा घेण्यासाठी आता गुंतवणूकदार तयारीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: सोन्याच्या बाजारात भाववाढीतही लग्नसराईमुळे ग्राहक स्थिर असून पुढील भाववाढीचा फायदा घेण्यासाठी आता गुंतवणूकदार तयारीत आहेत. सामान्य ग्राहक आजची खरेदी उद्याचा फायदा हे समजून घेत लग्नसराईची खरेदी आत्मविश्वासाने करत असल्याचेही चित्र आहे. मागील पंधरवड्यात सोने बाजारपेठेत दरवाढीचे वादळ उठले होते.

त्यावेळी ग्राहक सुरवातीला धास्तावला. पण लग्नसराईच्या ग्राहकांनी सोने खरेदी बजेटच्या बंधनात राहून केली व त्यात कमी खर्चाचे पर्याय शोधल्याने बाजार लग्नसराईच्या उलाढालीवर कायम आहे.

फायदा सर्वांचाच

सोन्याचे भाव अचानक वाढल्याने ग्राहकांना सुरवातीला अंदाज घेता आला नाही. पण आता सोने भाववाढीचा स्पष्ट अंदाज दिसू लागला आहे. सोन्याचे भाव ८५ हजारांच्या पुढे जातील असे उघडपणे अंदाज मांडले जात आहे.

त्यामुळे आता जी सोने खरेदी ग्राहक करत आहे त्यांना भाववाढीमुळे त्यांच्या खरेदीची किंमत वाढणार ही एक आशा समोर आहे. त्यामुळे लग्नसराईचा ग्राहक न डगमगता उत्साहाने खरेदी करतो आहे.

१८ कॅरेटचा पर्याय उत्तम

ग्राहकांना १८ कॅरेटचा सोन्याचा पर्याय देखील वापरता येत आहे. या कॅरेटमधील सोन्याच्या किमंती अगदी आवाक्यातील किमंतीत खरेदी करता येतात. त्याचाही उपयोग होऊ लागला आहे. त्यामुळे दागिने खरेदीचे बजेट नियंत्रणात राहते. तसेच पावतीसह खरेदी केल्यानंतर त्याची पुनर्विक्री देखील योग्य होते.

२२ कॅरेटचे दागिने उपयुक्त

सर्वसाधारणपणे बहुतांश फॅन्सी पद्धतीचे दागिने २२ कॅरेटमध्ये तयार होतात. तसेच २२ कॅरेटचा सोन्याच्या दर देखील त्या तुलनेत कमी असतो. या दागिन्यांची मागणी सर्वाधिक आहे. तयार फॅन्सी दागिन्यांकडे कल जास्त आहे. हे दागिने अधिक सुंदर तर आहेत. तसेच तयार दागिन्याच्या बाबतीत खरेदी पावतीवर नंतर देखील मोडीचे व्यवहार तेवढीच किंमत मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात.

अशी आहे सोन्याची सद्यःस्थिती

  • ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना पुढील काळात जादा भाव मिळण्याची शक्यता

  • लग्नसराईत पारंपरिक दागिन्यात सोन्याचे वजन जास्त असल्याने खरेदी कमी

  • कमी वजनाच्या ॲडव्हान्स डिझाईनच्या दागिन्याच्या खरेदीकडे कल

  • सोन्याच्या दागिन्याची मोड करण्याचे प्रमाण कमी

  • सोन्याचा भाव ८५ हजार होण्याची शक्यता

सोन्याचे भाव पुढील काळात वाढणार याचा अंदाज आल्याने ग्राहक आजच खरेदी करुन पुढे वाढत्या किंमतीचा फायदा घ्यावा या हेतूने खरेदी करत आहे. केवळ बजेटच्या निकषावर लग्नसराईची खरेदी होत असल्याने ग्राहकी स्थिर आहे.

- प्रदीपकुमार शिंगवी, शिंगवी ज्वेलर्स, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update : मोहोळ पोलीस ठाण्याच्यावतीने रन फॉर युनिटी उपक्रम

SCROLL FOR NEXT