Good news ... After rains in Madha taluka Sowing almost started ...! 
सोलापूर

गुड न्यूज... माढा तालुक्‍यात पावसानंतर पेरणीची लगबग सुरू...!

सकाळ वृत्तसेवा

माढा : माढा तालुक्‍यात बहुतेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली असून माढयात सुमारे तीन तास जोरदार पाऊस झाला आहे. माढयात तीन तासांत 46.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झालेल्या भागात पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. 

माढा तालुक्‍यात माढा, विठ्ठलवाडी, जाधववाडी, वडशिंगे, उंदरगाव, केवड या भागात जोरदार पाऊस झाला. बुधवारी (ता. 10 ) रात्री पावणेदहाला पावसास्‌ सुरूवात झाली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत जोरदर पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळयातील हा पहिलाच मोठा पाऊस होता. या पावसामुळे शेतातील काही ठिकाणी बांध फुटून माती वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 


पावसाबरोबर वारा नसल्याने फारसे नुकसान झाले नसले तरी काही ठिकाणी बांध फुटले आहेत. यंदाच्या पावसाळयात आतापर्यंत तीन चारवेळा पाऊस झाला आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु तालुक्‍यातील काही गावांमध्ये अद्याप पेरणीस पुरेसा पाऊस झाला नाही. तालुक्‍यात सर्वदूर मोठा पाऊस झाला नाही. कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. काल तालुक्‍यात सरासरी 15.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

माढा तालुक्‍यात मंडळनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये) 

  • माढा 46.3
  • कुर्डुवाडी 10.4
  • टेंभुर्णी 12.2
  • रांझणी 10
  • दारफळ 4
  • म्हैसगाव 7.3
  • रोपळे (कव्हे) 6.5,
  • मोडनिंब 24.4.
  • तालुक्‍यात सरासरी 15.9

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT